लेख

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया एक वरदान व काळाची गरज ! डॉ. मिहीर चितळे.

नमस्कार, शस्त्रक्रिया म्हटलं की आपल्याला धडकी भरते आपलं पोट फाडणार की काय ? आपल्याला शेकडो टाके पडणार की काय? शस्त्रक्रियेनंतर आपण हॉस्पिटलमध्ये अंथरूण धरून बरेच दिवस ऍडमिट राहणार की काय? असे बरेच प्रश्न पडतात व चिंता वाटते म्हणून बरेच लोक काही शस्त्रक्रिया लागणाऱ्या आजारांचे निदान होऊन सुद्धा शस्त्रक्रिया टाळतात. यामुळे थोडक्यात बरा होणारा आजार वाढतो आणि मग जास्त गंभीर परिस्थिती होते या सगळ्याला उत्तर म्हणजे ‘मिनीमल इन्वेसिव्ह सर्जरी’ म्हणजेच दुर्बिणी द्वारे शस्त्रक्रिया.
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्यामुळे शस्त्रक्रियेनंतरचा प्रवास खूप सुखकर असतो. वेदनादेखील खूपच कमी होतात. असे का? तर त्याचे उत्तर हे आहे ! दुर्बिणीद्वारे केलेल्या शस्त्रक्रियेमध्ये अर्ध्या किंवा एक सेंटीमीटर (1/2 | 1cm) च्या छोट्याशा कट मधून दुर्बीण पोटात जाते व पूर्ण शस्त्रक्रिया त्यातून होते. आता असा प्रश्न पडतो की भल्या मोठ्या पोट फाडून किंवा छाती फाडून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया इतक्याशा जागेतून कशा होऊ शकतात? तर यासाठी डॉक्टर स्पेशल ट्रेनिंग घेतात. ‘मिनिमम इन्वेस्टीव्ह सर्जरी’ मध्ये पारंगत असलेल्या डॉक्टरांना त्यांचा सर्जिकल स्किल व एक्सपार्टीज नुसार ठराविक सर्जरीस जमतात. कोणत्या कोणत्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे करता येतात? तर सर्व प्रकारचे हर्निया, पोटातील गाठी, गर्भाशयातील व अंडकोशातील गाठी, पित्ताशयातील झालेले खडे, जठराचे आजार गाठी, वारंवार होणारी ऍसिडिटी व जळजळ अन्ननलिका व जठराच्या जंक्शन ला असलेल्या हर्निया साधूपिंडाचे आजार, काळजात व सिंहामध्ये असलेल्या गाठी, मोठ्या व छोट्या आतड्याच्या गाठी व आजार अजून बरेच काही दुर्बिणीद्वारे उत्तमरीत्या होऊ शकते. थायरॉईडच्या गाठी किंवा आजार मानेतील गाठी देखील दुर्मिद्वारे बरे होऊ शकतात.


छातीतील किंवा वक्षस्थळातील (छातीचा पिंजरा व आतील भाग) आजार व टुमार्स देखील दुर्बिने द्वारे ऑपरेशन केले जाऊ शकतात. कॅन्सर म्हंटलं की जीव घाबरतो. आज मेडिकल शास्त्र इतकं पुढं गेलं आहे की, नवीन नवीन औषधे व शस्त्रक्रियेने आपण कॅन्सरला देखील मात देऊ शकतो. कॅन्सरच्या शस्त्रक्रिया देखील चिरफाड न करता तितक्यात चांगल्या प्रकारे क्लिअरन्स दुर्बिणीद्वारे आपण करू शकतो. अशा अवघड शस्त्रक्रिया ॲडव्हान्स मिनिमम इन्वेसीस सर्जरी ज्याने खूप वर्ष या क्षेत्रात काम करून व वेगवेगळ्या फेलोशिप्स घेतले आहेत व ट्रेनिंग घेतले आहे अशा सर्जन करू शकतो. रोबोटिक सर्जरी हे देखील मिनिमम इनवेसीस सर्जरी आहे. जी सध्या खूप ऍडव्हान्स झाली आहे. दुर्बिणीतून सज्जनला दिसणारी प्रतिमा ही भिंगातून बघितल्यासारखी अधिक मोठी विस्तारीत दिसते व यामुळे टिमरचे भाग सुद्धा अधिक चांगल्या रित्या दिसू शकतात. दुर्बिणीने पोटाच्या किंवा वक्ष स्थळातील भागातला कोणताही कानाकोपरा सहजरीत्या तपासता येतो.
दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियेनंतर पेशंट खूप कमी काळ हॉस्पिटलमध्ये राहतो. काही केसेस मध्ये तर त्याच दिवशी किंवा शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी किंवा शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज होतो. किंवा घरी सोडल्या जाऊ शकतो. कारण आपली शस्त्रक्रिया झाली आहे असे त्याला वाटतच नाही. कारण वेदनाच नसतात याहून चांगले काय असणार मंडळी थोडक्यात सांगायचे तर Minimal Invasive Surgery is the answer to many, if not all Surgical Problems !
Advanced Minimal Invasive Surgeon किंवा योग्य डॉक्टरांकडून योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून एका आजारी माणसाचा प्रवास निरोगी होण्यापर्यंत एकदम सुखकर व वेदनाहीन होऊ शकतो.
डॉ. मिहिर चितळे

दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!