कोकण प्रमुख सैफ सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्ह्यातून कार्यकर्त्यांची विशेष उपास्थिती.
चिपळूण : (ओंकार रेळेकर) राजकीय पक्षांच्या सोबत जाण्यापेक्षा महाराष्ट्रात पोलिसांच्या न्याय आणि
हक्कासाठी लढू असा एकमुखी निर्णय महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी घेतला.महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटची अस्तित्व राज्य बैठक पोलीस पत्नी आसराबाई अर्जुन दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली या संघटनेचे कोकण प्रमुख चिपळूणचे सुपुत्र सैफ सुर्वे हे देखील रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनच्या फौज फाट्यासह उपस्थित होते.या वेळी
संघटनेवर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील विविध विभागातून आलेल्या अपंग बांधवांची उपस्थिती लक्षवेधी होती.
नुकतीच शिर्डी येथे राहुल दुबाले यांच्या मातोश्री आसराबाई अर्जुन दुबाले यांच्या.
प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची अस्तित्व राज्य स्तरीय बैठक संपन्न झाली बैठकीला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकूण ३२ जिल्ह्यामधून पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या वेळी संघटने केलेल्या कामाचा आढावा पहिल्या सत्रात घेण्यात आला दुपार नंतर पुढील येणाऱ्या वर्षात संघटनेच्या नियोजित कार्याविषयी विचार विनिमय झाले. प्रमुख मार्गदर्शक मिलिंद जोशी यांनी संघटनेचे ध्येय समजून सांगितले
या बैठकी साठी अहमदनगर , शिर्डी आणि रत्नागिरी जिल्ह्यातून उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी यशस्वितेसाठी विशेष मेहनत घेतली राजकीय पक्ष्यांच्या सोबत जाण्या पेक्षा आम्ही पोलिसांसाठी लढू आणि युवकांना दिशा देऊ अशी एकमुखी मागणी संपूर्ण कार्यकर्ते ,पदाधिकारी यांच्या तोंडी होती. संघटनेवर प्रेम करणाऱ्या आणि सुमारे चारशे किलोमीटर प्रवास करून आलेल्या अपंग कार्यकर्ते यांची उपस्थिती लक्षवेधि होती.पोलीस परिवार महामंडळ, महाराष्ट्र पोलिसांना सेवेत असतांना मोफत आरोग्य सुविधा, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी कर्मचारी यांना मोफत आरोग्य सुविधा, महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी कर्मचारी यांना हक्काची घरे, पोलीस पाल्यांना पोलीस भरती मध्ये वडील सेवेत असतांना आरक्षण , सेवेत असतांना पदोन्नतीने अधिकारी झालेल्या मुलांना पोलीस पाल्य आरक्षण लागू करणे, पोलीस पाल्यांची स्वतंत्र पोलीस भरती घेणे, vrs(मेडिकली अनफिट असणारे)स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या पाल्यांना सेवेत रुजू करून घेणे शासन निर्णय परत चालू करणे, पोलीस पाल्यांना उच्चशिक्षणासाठी स्कॉलरशिफ चालू करणे अश्या अनेक मुद्यांवर सर्वानुमते ठराव करून चर्चा करण्यात आली. संघटनेच्या वतीने प्रत्येक वर्षी २६/११ रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलिसांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रम राज्य भर राबविला जातो याच प्रमाणे या वेळी ही राज्यभर करावा अशा सूचना राहुल दुबाले यांनी केल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष राहुल दुबाले, मिलिंद जोशी यांनी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेने पोलिसांच्या हक्कासाठी नेहमीच आक्रमकपणे बाजू लावून धरली. डीजी होम लोन, कोविडकाळात विमा कवच यासह विविध मागण्यांची पूर्तता करण्यात संघटनेला यश आले.कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराला मेहनत घेणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचे राहुल दुबाले यांनी विशेष आभार मानून महाराष्ट्र पोलिस् बॉईज संघटनेची ताकत या पूर्वी पेक्षाही अधिक जोमाने पोलीस कर्मचाऱ्यांच्या मागे लाऊया असे आवाहन केले.
दखल न्यूज महाराष्ट्र.