नियमित तपासणी केल्यास डोळ्याच्या आजारापासून मिळू शकते मुक्ती : डॉ. श्रीधर ठाकूर
चिपळूण : (ओंकार रेळेकर) वेळेवर नियमित डोळ्याची तपासणी करून योग्य उपचार करून घेतल्यास डोळ्याच्या आजारपासून मुक्ती मिळू शकते या करीता इन्फिगोने जिल्ह्यात आयोजित केलेल्या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन इन्फिगो आय हॉस्पिटल चे प्रमुख डॉ.श्रीधर ठाकूर यांनी बुधवारी येथे बोलतांना केले. कोकणातील नामवंत इन्फिगो आय हॉस्पिटल रत्नागिरी यांच्या वतीने
चिपळूण मधिल प्रसिद्ध स्प्रींग क्लीनिक येथे बुधवारी डोळ्यावरील विविध आजारावरील आणि मधुमेह असलेल्या रुग्णाच्या डोळ्याच्या तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. मधुमेह असलेले डोळ्याच्या आजारावरील रुग्ण आणि अन्य रुग्ण असे गुहागर ,चिपळूण मधील सुमारे पन्नासहुन् अधिक रुग्णांनी शिबीराचा लाभ घेतला काल गुरुवारी १७ रोजी राजापूर येथील डॉ. जोशी हॉस्पीटल
येथे आयोजित या शिबीराला राजापूर आणि जवळच्या परिसरातील असंख्य रुग्णांनी शिबिरात तपासणी करून घेतली . दूरवरच्या गावांमधील
रुग्णांना डोळे तपासणी करीता रत्नागिरी येथील इन्फिगो मुख्य हॉस्पिटल येणे प्रवासातून शक्य होत नसेल तर अशा रुग्णांना जिल्ह्यात विविध ठिकाणी या पुढेही अशा प्रकारच्या शिबराचे आयोजन करण्यात येणार आहे.चिपळूण मध्येही पुढील महिन्यात १५ डिसेंबर नंतर स्प्रींग क्लिनिक येथे शिबीर होणार आहे अशी माहिती डॉ.श्रीधर ठाकूर यांनी दिली. आज शुक्रवार दि.१८ रोजी खेड मधील डॉ. धारिया हॉस्पीटल येथे शिबीर होणार असून उद्या शनिवार दि. १९ रोजी दापोली हर्णे येथील हर्णे माळेकर सभागृह तर रविवार दि. २० रोजी साखरपा येथील नाना शेट्ये सभागृहात हे शिबीर होणार आहेत.रक्तातील सततच्या अनियंत्रित साखरेच्या पातळीमुळे डायबेटिस असणाऱ्यांच्या डोळ्याचा पडदा, किडनी, हृदय, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांवर दीर्घकालीन दुष्परीणाम होतात. डोळ्याच्या पडद्यावर साखरेमुळे होणारे हळूहळू दृष्टीनाश घडवून आणतात. यामुळे खालील समस्या उद्भवतात… डोळ्यात वारंवार जंतुसंसर्ग होणे. तरुण वयात मोतीबिंदू होण्याची शक्यता. पडद्यावरील रक्तवाहीन्यांची हानी होऊन त्या ठिसूळ होणे. अशा ठिसूळ रक्तवाहीन्या साध्या खोकण्या अथवा शिंकण्याने सुद्धा क्वचित प्रसंगी फुटू शकतात व डोळ्यात रक्तस्त्राव होतो. पडद्याला सूज येणे व छिद्र पडणे किंवा पडदा सरकणे. डायबेटीसमुळे होणारा दृष्टीनाश कायम स्वरूपी असतो व ही हानी कधीही भरून येत नाही. पुष्कळ वेळेस डायबेटीस असण्याऱ्या व्यक्तिंच्या डोळ्यांची हानी ही वेळीच लक्षात येत नाही व जेव्हा लक्षात येते तेव्हा उशीर झालेला असतो. डोळ्यात थेंब घालून पडद्याची तपासणी व डोळ्याचा ३D स्कॅन करून पडद्याचे झालेले नुकसान तपासून घेता येते व पुढील उपचार करता येतात. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात डोळे व रेटीना यावरील सुपर स्पेशालिटी सुविधा फक्त इन्फिगो मध्येच उपलब्ध आहेत याचा रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन या वेळी बोलताना रेटींना तज्ञ डॉ .प्रसाद कामत यांनी दिली इन्फिगो हॉस्पिटल मधील रुगणांवर् रेटीनाच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया व लेझर उपचार सुप्रसिध्द रेटीना तज्ञ डॉ. प्रसाद कामत यांच्या वैयक्तिक सल्ल्याने केले जातात. डॉ. प्रसाद कामत, ‘शंकर नेत्रालय’ चेन्नई येथून प्रशिक्षित आंतरराष्ट्रीय किर्तीचे रेटीना तज्ञ आहेत. डायबेटीस असणाऱ्या सर्वांची गैरसोय लक्षात घेऊन रेटीना तज्ञ आपल्या गावांत’ या अभियानाद्वारे ‘इन्फिगो’ चे रेटीना स्पेशालिस्ट डॉ. प्रसाद कामत स्लिट लॅम्प व १० पद्धतीने पडद्याची तपासणी व उपचार करणार आहेत. या ठिकाणी अत्याधुनिक जर्मन 3D स्कॅन आणण्यात येणार असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक असल्यास डोळ्याच्या पडद्याचा ३D स्कॅन रु. ३०००/- ऐवजी शिबिराच्या दिवशी फक्त रु. २०००/- इतक्या सवलतीत करण्यात येणार आहे. तरी आपणा सर्वांनी नोंदणी करून या अमूल्य संधीचा लाभ घ्यावा. रेटीना तज्ञांद्वारे तपासणी केले जाणारे हे शिबिर आपल्या गावात पहिल्यांदाच होत आहे. या तपासणीसाठी साधारण ४५ मिनिटे लागतात. त्यामुळे पूर्व नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ९३७२७६६५०४, ९३७२७६६५०८, ९१३७१५५४९० येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. फोटो : इन्फिगो आय हॉस्पिटल रत्नागिरी तर्फे बुधवारी
स्प्रींग क्लिनिक चिपळूण येथे आयोजित शिबीरा विषयी माहिती देतांना डॉ.श्रीधर ठाकूर ,डॉ. प्रसाद कामत छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801