चिपळूण : (ओंकार रेळेकर) कोकणातील शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसायाचा पर्याय उभा करून त्यांना समृद्ध करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मे. वाशिष्ठी मिल्क अँड प्रॉडक्ट्स प्रा. लि. या दुग्ध प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. हा प्रकल्प पूर्णत्वास गेला असून हा प्रकल्प आता ग्राहकांच्या सेवेत लवकरच रुजू होत असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव व संचालिका सौ. स्वप्ना यादव यांनी दिली.
यावेळी ते म्हणाले की, चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुभाषराव चव्हाण यांनी संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात मोठा पल्ला गाठला आहे. या कालखंडात गरजूंना सुलभ पध्दतीने कर्ज पुरवठा करतांना सुशिक्षित तरुणांना व्यवसायासाठीदेखील वेळेत कर्ज पुरवठा करून स्वावलंबी बनविण्यात मोठा हातभार लावला आहे. मात्र, येथील शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, ही भूमिका नेहमीच स्पष्ट केली होती. यानुसार आम्ही दुध प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आणि अल्पावधीतच पिंपळीखुर्द येथे गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सची मुहूर्तमेढ रोवली. दुधासह दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, तूप, सुगंधी दूध या दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्याचा संकल्प सोडला. इतकेच नव्हे तर अतिशय दर्जेदार आणि कोणतीही तडजोड न करता तयार होणारे दुग्धजन्य पदार्थ ग्राहकांचा विश्वास नक्की सार्थ ठरवतील, असा आम्हाला विश्वास आहे. आता हा प्रकल्प पूर्णत्वास जात असताना कोकण नव्हे तर महाराष्ट्रात कार्पोरेट अशी या दुग्ध प्रकल्पाची इमारत उभी राहिली आहे. हा प्रकल्प म्हणजे अन्य प्रकल्पधारकांच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरेल, असा आमचा विश्वास आहे. या प्रकल्पाची इमारत उभी राहत असतांना शेतकऱ्यांकडून दुध संकलन करण्याचा आम्ही निर्णय घेतला. यानुसार मालघर, पिंपळीखुर्द (ता. चिपळूण) आंबडस, चिंचघर दस्तुरी (ता. खेड) या ठिकाणी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या संकलन केंद्रातून दररोज १० हजार लिटर दुध मिळत आहे. यावरून शेतकऱ्यांना दूध प्रकल्पाची किती गरज होती? हे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या दुधाला उत्तम दर मिळत आहेच तर बिले देखील वेळेत मिळत असल्याने शेतकऱ्यांची धावपळ कमी झाली आहे. यामुळे हा दुग्ध प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल, अशी भावना या प्रकल्पाचे संचालक प्रशांत यादव व संचालिका सौ. स्वप्ना यादव यांनी व्यक्त केली आहे. तर या प्रकल्पात अनेकांना रोजगार मिळाला आहे. एकंदरीत शेतकरी व तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे, यातच आम्हाला आनंद आहे, अशी भावना देखील यावेळी व्यक्त केली.
हा प्रकल्प लवकरच कोकणवासीयांच्या सेवेत रुजू होणार असून पहिल्या टप्प्यात ‘मिल्क पाऊच’ ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. वाशिष्टी दूध ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरेल, असा आमचा विश्वास आहे. तर नंतर टप्प्या-टप्प्याने दुग्धजन्य पदार्थ उत्पादने घेतली जाणार आहेत, असे यावेळी शेवटी सांगितले. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांमध्ये आर्थिक समृद्धी येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रवाहात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना जे जे सहकार्य लागेल ते आम्ही करू, अशी ग्वाही यादव दाम्पत्याने दिली आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ वेगवेगळ्या आजारांवर दुर्बिणीद्वारे केली जाणारी शस्त्रक्रिया आता रत्नागिरी मध्ये उपलब्ध..
▶️ प्रगत मिनिमल इनवेसिव्ह सर्जरी.
▪️ लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️ कर्करोग शस्त्रक्रिया
▪️रोबोटिक शस्त्रक्रिया
▪️थोरॅकोस्कोपिक शस्त्रक्रिया
▪️एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया
▶️ आजच संपर्क करा..
▶️ डॉ. मिहीर चितळे
संपर्क: +९१ ९९३०५ ९९४७४ www.drmihirchitale.com
चितळे नर्सिंग होम, टिळक आळी, रत्नागिरी.
फोन नंबर : 223115
📞 7263096801