रत्नागिरीः मातृभूमी प्रतिष्ठान व स्वयंसिध्दा समुहाच्या किणे परीवाराच्या विविध क्षेत्रातील महिलांच्या सत्कार सोहळयाप्रसंगी रत्नागिरी टाईम्स च्या संपादिका उर्मिला घोसाळकर यांचे हस्ते महिलांचे सत्कार व दिपप्रज्व्ालन करण्यात आले. याप्रसंगी आपण एलएलबी करून व रत्नागिरी टाईम्स च्या माध्यमातून एक सशक्त महिला म्हणून कार्य करीत असुन आपण कोणत्याही क्षेत्रात काम करीत असू तरीही आपल्याला स्वत्ाःच्या पायावर उभे राहून स्वयंसिध्द होणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. स्वयंसिध्द उपक्रमाबद्दल त्यांनी पूर्वा व प्राज्ाक्ता किणे यांचे कौतुक केले.
स्वयंसिद्धा या विविध क्षेत्रातील महिलांच्या सन्मान सोहळ्यानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जेंडर इक्विलिटी व महिलांची कामगिरी अतिशय उत्तम असल्याचे मत रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पुजार यांनी व्यक्त केले. वीर सावरकर नाट्यगृहामध्ये मातृभूमी प्रतिष्ठान, एफएम मँगोसिटी, जय फिल्मस् आयोजित कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टर, पोलीस, इंजिनियर, बचतगट, उद्योजिका, पत्रकार, कलाकार, सफाई कर्मचारी, आदर्श गृहिणी, शिक्षिका, वकील अशा विविध क्षेत्रातील निवडक 100 महिलांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी रत्नागिरी टाइम्सच्या संपादिका उर्मिला घोसाळकर, माजी नगराध्यक्ष मिलींद किर, शिवसेना शहराध्यक्ष बिपिन बंदरकर, अरिहंत कन्स्क्शनचे मुकेश गुंदेचा, कोकण बँक व शिरगाव ग्रा.प. सरपंच फरिदा काझी, नगरसेविका शिल्पा सुर्वे, न.प.चे डेप्युटी सीओ नंदकुमार पाटील, उदयोग केंद्राच्या प्रमुख विदया कुलकर्णी, कोतवडे ग्रा.प.चे सरपंच तुफिक पटेल, उद्योजिका वायंगणकर, दै फ्रेश न्यूजच्या संपादिका प्राजक्ता किणे, मंगल निनाद प्रा.लि.च्या सीईओ पूर्वा किणे व मातृभूमि प्रतिष्ठानचे प्रविण किणे हे उपस्थित होते.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व शिव छत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुमारी पुर्वा किणे यांनी केले. त्याप्रसंगी शिवाजी महाराजांची गर्द घोषणा दिली. याला सर्वांनी भरभरुन प्रतिसाद दिला. प्रास्ताविकामध्ये कै. मंगल किणे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गेली 7 वर्षे हा उपक्रम राबवित असल्याचे व कोरोना काळात 3000 हून अधिक महिलांना विविध ऑनलाईन कोर्सेस मोफत शिकविले असल्याचे त्यांनी सांगितले. स्वा.सैनिक, शिक्षक व शेतकरी हा आपल्या कुटुंबालाभलेला वारसा व रत्नागिरीमध्ये आपला झालेला जन्म हा या भूमिचे देणं फेडण्यासाठी मिळालेली उर्जा याच मधून स्वयंसिद्धा या संकल्पनेचा जन्म झाला. त्यानंतर प्रविण किणे यांनी यापुढील काळात अनाथ मुलांना दत्तक घेवून त्यांची सर्वतोपरी जबाबदारी घेणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व आजच्याच दिवशी कल्पना चावला अंतराळात गेली होती. या सर्वांचा गोष्टीरुप संदर्भ देवून समाजातील असंख्य नारीशक्तीचा जागर या कार्यक्रमात करीत असल्याचे सांगितले.
उदयोग केंद्राच्या विदया कुलकर्णी यांनी महिलांनी सक्षम होणे व घरात पैसे आले पाहिजेत तरच आपण स्वयंसिध्द झालो असे मानले पाहिजे. स्वयंसिध्द होवून आपण कशा प्रकारे समृध्द होवू शकतो याचे मार्गदर्शन केले. श्री नंदकुमार पाटिल यांनी महिलांनी आज सर्वच क्षेत्रात प्रगती केली असल्याबददल उल्लेख करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. शिरगावच्या सरपंच, केटीव्ही व कोकण ब्ॉकेच्या संचालिका फरीदा काझी यांनी महिला म्हणून एकमेंकींना मदत करून समाजाचा व स्त्रीत्वाचा विकास करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. तुफीक पटेल यांनी ग्रामीण भागातील महिला कशा सक्षमपणे पुढे येत आहेत व स्वयंसिध्द महिलांचे उदयोगासाठी पुढाकार घेण्याबाबत मार्गदर्शन केले. वायंगणकर डायनिंगच्या वायंगणकर यांनी उच्च शिक्षण घेवून सुध्दा आपल्या कुटुंबाच्या मदतीने आपण व्यवसायात सक्षमपणे उभ्या सेअसून महिलांनी पुढे आले पाहिजे असे सांगितले. रत्नगिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद किर यांनी रत्नागिरीच्या जडणघडणीतील आमदार कुसुम अभ्यंकर व इतर महिलांचा उल्लेख करत सत्कारास उपस्थित असणाऱ्या सर्व महिलांना अत्मबल वाढवून आपपाल्या क्षेत्रात अशीच गरूडभरारी घेण्याबाबत शुभेच्छा दिल्या.
यावेळी अश्विनी मोरे, वैष्णवी सावंत, निलिमा इंदुलकर, डॉ. सुरभा कांबळे, स्नेहा चव्हाण, अदिती भावे, प्रिया कांबळे, सुप्रिया सावंत, स्नेहा शिवलकर, सर्वता चव्हाण, तुळवे अहमद, निकत डिंगणकर, पालवी सावंत, शिल्पा मराठे, शंकुंतला राजहंस, चारुशीला अडमुटे, मेघना करवडे, दिलशाद नाईक, मेहक वाडकर, सबा पाटील, स्वाती गांगण, रेखा बेग, 23 स्वाती नाखरेकर, शमा थोडगे, 25 सुचिता कांबळे, देविका सावंतदेसाई, अकिला मजगावकर, हलिमा होडेकर, सुजाता कांबळे, राजश्री चव्हाण, अस्मिता कोत्रे, प्रिती मकवाना, मीना मकवाना, दिप्ती जाधव, पल्लवी उके, श्रद्धा बेहरे, नुसत नाकाडे, गायत्री मांडवकर, ललिता सावंत, सायली वायंगणकर, शिल्पा मुंगळे, जिजा किंजळे, मिनाज राजापकर, प्रियदर्शनी रावराणे, रहिमा कापडे, निकिता शिवलकर, विद्या कुलकर्णी, डॉ. अफरोजा अत्तार, प्रतिभा साळुंखे, पूजा शेट्ये, तबस्सुम पटेल, निकिता कांबळे, प्रियांका जाधव, अर्चना जोशी, सुवर्णा सावंत, श्रेया साखरकर, दीक्षिता मयेकर, धनश्री आंब्रे, साक्षी कळंबटे, दिपाली कांबळे, सुषमा शिंदे, मोगरा समुह, साजिरी महिला गट, श्री समर्थ समुह, जीवनज्योती महिला संघ, जिजामाता उत्पादक गट, कस्तुरी उत्पादक गट, सोहम महिला समुह, धनज्योती महिला संघ, मैत्री महिला समुह, हिरकणी संघ, संपदा जोशी, विद्या कदम, पौर्णिमा साठे, सोनाली सावंत, प्रेरणा शिंदे, गौरी मुळे आदी महिला उपस्थित होत्या.
सौ. प्राज्ाक्ता किणे यांनी आभार मानले व सुत्रसंचालन सौ पेनकर यांनी केले. या कार्यक्रमात वेल्डींग काम करणाऱ्यापासुन सफाई कर्मचारी अशा अनेक महिला कोणताही भेदभाव न ठेवता आपण सर्व महिला म्हणून सक्षमपणे एक कशा आहोत याचे उदाहरण दिले याप्रससंगी विविध हिंदी व मराठी गितांचा कार्यक्रमामुळे सत्कार व गीते यामुळे कार्यक्रमाला रंगत आली.