➡️ मेष : आपण केलेल्या चुकांमधून काहीतरी शिकण्यासारखे असते त्यातूनच सुधारणा घडवा. आज आरामात राहण्यास तुम्ही पसंद कराल. इन्कम टॅक्स कर्ज संदर्भातील कागदपत्रे तयार ठेवा. आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा असणार आहे.
➡️ वृषभ : महत्वपूर्ण व्यक्तीशी आज भेट होईल जी तुमच्यासाठी चांगली असेल. तुमच्या मुलांचे आत्मविश्वास वाढण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक बाजू सामान्य राहील राजकारणापासून स्वतःला आजचा दिवस लांबच ठेवा.
➡️ मिथुन : आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक असणार आहे. आज तुम्ही घेतलेला निर्णय यशस्वी ठरणार आहे. आज परिवारामध्ये आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या शब्दावर नियंत्रण ठेवा कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.
➡️ कर्क : ग्रहांची स्थिती आज तुमच्या बाजूने आहे. घरातील विषयांना गांभीर्याने घ्या अचानक खर्च समोर येईल. घरातील एकमेकांना सन्मान द्या. आज तुमच्या खाण्यावर नियंत्रण ठेवा.
➡️ सिंह : सकारात्मक वेळ येत आहे. तुमची अस्वस्थता सुधारणार आहे. तुम्ही खूप ऊर्जावान असणार आहात. थांबलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील व्यक्तींशी संपर्क ठेवणे योग्य राहील. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हिताचे नाही.
➡️ कन्या : दिवसाची सुरुवात चांगली होईल. उधार दिलेला पैसा पुन्हा मिळेल सफलता मिळेल. घरामध्ये छोट्याशा कारणामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात कोणतेही निर्णय घेताना आर्थिक गोष्टीचा विचार करून घ्या.
➡️ तुळ : महत्त्वपूर्ण व्यक्ती बरोबर भेट होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी आध्यात्मिक गोष्टींमध्ये रुची निर्माण करणार असेल. आर्थिक व्यवहारात आपण सतर्क राहणे गरजेचे आहे. राजकारणापासून दूरच रहा घरगुती विषयात वादाच्या विषयात मध्यस्थी पेक्षा तुमचे मत काय आहे हे महत्त्वाचे आहे.
▶️ वृश्चिक : व्यस्त अशा दिवसांमध्ये देखील तुम्ही मित्रांसाठी नातेवाईकांसाठी वेळ द्याल. आज कोणाकडून भेटवस्तूही मिळू शकते. धार्मिक कामात सहभागी व्हाल. व्यवसायात कोणतीही रिस्क घेऊ नका. प्रॉपर्टी डीलिंग संदर्भात आज तुम्हाला चांगली वार्ता मिळेल.
➡️धनु : महत्त्वपूर्ण अशा प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणे फायद्याचे राहील. हातातून एखादी गोष्ट निसटू देऊ नका विचारपूर्वक निर्णय घ्या. आज तुम्ही तुमच्या कामांमध्ये व्यस्त राहणार आहात. कामामध्ये बदल होऊ शकतो. कोर्ट-कचेरी संदर्भातील निर्णय तुमच्या बाजूने असतील.
➡️ मकर : ग्रहस्थिती चांगली आहे. महिलांना त्यांच्या योग्यतेनुसार आज काम मिळेल. व्यवसायामध्ये लाभ मिळण्यासाठी तुमची निर्णय प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. प्रॉपर्टी संदर्भात तुम्हाला फायदा होईल, परिवारामध्ये एकमेकांचा सन्मान करा.
➡️ कुंभ : आज परिवारासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील. आज तुम्हाला मित्र परिवारांचा उपयोग होणार आहे. इतरांच्या जबाबदाऱ्या स्वतःवर घेऊ नका त्यामध्ये यश मिळणार नाही. विद्यार्थी वर्गाला अभ्यासाकडे लक्ष द्यायला हवे आहे.
➡️ मीन : आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. घर परिवाराबरोबर वेळ घालवा आत्मविश्वास आणि थोडीशी सावधगिरी तुम्हाला प्रत्येक कामात सफलता देईल. कष्टाचे फळ नक्की मिळेल. मार्केटिंग आणि प्रॉडक्ट संदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्.