Uncategorizedबातम्या

माणगांवात अज्ञान मुलीवर अत्याचार

प्रतिनिधी : राम भोस्तेकर माणगाव

माणगांव : तालुक्यातील एका अज्ञान मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तरपणे असे की, दि. २९ नोव्हेंबर रोजी दु. १२ वा. च्या सुमारास निजामपूर रोडला सुमारे एक किलोमीटर अंतरावर आरोपी संतोष गोविंद टेंबे, वय ३२ वर्ष, रा. हातकेळी, ता. माणगांव याने पीडित मुलगी ही अज्ञान असून तिच्या अज्ञातपणाचा फायदा घेत टेंबे याने त्याच्या रिक्षात बसवून निजामपूर रोडला जंगलभागात रिक्षा थांबवून पीडित मुली सोबत जबरदस्ती शारिरीक संबंध करून त्याबाबत कोणाला सांगू नकोस, मी बोलवेन तेव्हा येत जा नाहीतर तुझे फोटो सर्वांना पाठवेन अशी धमकी दिली.
या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलीस ठाण्यात कॉ. गु. र. नं. ३५०/२०२२ भा. दं. वि. सं. क. ३७६ (२) जे, ३७६ (२) (एन), ५०६, बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४, ८ प्रमाणे करण्यात आली असून पुढील तपास पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म. पो. स. ई. अस्मिता पाटील करीत आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!