प्रतिनिधी : राम भोस्तेकर
माणगाव
: तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाणे हद्दीत एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की,६ डिसेंबर रोजी १ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शेखर शिवाजी टेम्बे यांचा भाऊ साहिल शिवाजी टेम्बे हा मित्राचे घरी जेवण करून भाऊ व मित्रासोबत घरी येत असताना गोरेगाव हद्दीतील नारायण उमाजी भात्रे यांच्या चालू असलेल्या घराच्या बांधकामाजवळ पाण्याच्या पंपाकरिता आणलेल्या चालू लाईट च्या वायर ला अंधारात शॉक लागून मयत झाला. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाणे येथे आकस्मिक मृत्यू र जि नं२२/२०२२ सी आर पी सी कलम १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदारी एस डी शिंदे करीत आहेत.
दखल न्यूज महाराष्ट्र.