बातम्या

प्रवाशांच्या जीवशी खेळ.?
राज्यातील २,९०२ बसगाड्यांमध्ये नियमांची पायमल्ली; १,१३७ खासगी बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणा बंद..

मुंबई : सर्वच राज्यांमध्ये वाहतुकीसाठी काही नियम ठरवून दिले गेले आहेत प्रवासी वाहतुकीसाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेतेसाठी प्रत्येक गाडीमध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अग्निशामक यंत्रणा असणे आवश्यक आहे मात्र या नियमांची सर्रास पायमल्ली होताना दिसत आहे. दिवाळीसणासुदीच्या निमित्त खासगी, सरकारी बसगाड्यांना गर्दी असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होत आहे. नाशिकमध्ये खासगी प्रवासी बसला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर परिवहन विभागाने नियम धाब्यावर बसविणाऱ्या बस वाहतुकदारांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत राज्यातील दोन हजार ९०२ बसगाड्यांमध्ये नियमांची पायमल्ला झाल्याचे निदर्शनास आले. तर त्यापैकी एक हजार १३७ बसगाड्यांमधील अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नसल्याचे आढळून आले. १५ दिवस विशेष मोहीम राबवून नियम धाब्यावर बसविणाऱ्यां विरुद्ध कारवाई करण्यात आली.

जाहिरात…


महत्त्वाची बाब म्हणजे सध्या दिवाळीनिमित्त खासगी बसगाड्यांनाही गर्दी असून मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक होत आहे. राज्यातील विविध आरटीओंनी १५ दिवसांत ११ हजार ५११ खासगी प्रवासी बसगाड्यांची तपासणी केली. यापैकी तब्बल दोन हजार ९०२ बसगाड्यांमध्ये वाहतूकविषयक नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे उघड झाले. आरटीओने या बस चालक-मालकावर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्याकडून ७१ लाख १६ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. होत असलेली कारवाई यामुळे यानंतर खाजगी बस वाहतूक यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने पावले उचलली जातील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दोषी आढळलेल्या दोन हजार ९०२ पैकीही एक हजार १३७ बसगाड्यांमध्ये अग्निशमन यंत्रणाच कार्यरत नसल्याचे आढळून आल्याची माहिती आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. एखाद्या बसला आग लागल्यास त्वरित आग विझवण्यासाठी यंत्रणाच उपलब्ध नसल्याने प्रवाशांच्या जीवाशी खेळ होत आहे. काही बसचे आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजेही कार्यरत स्थितीत नव्हते. याशिवाय ८५६ बसगाड्यांमध्ये इंडिकेटर, वायपर, रिफ्लेक्टर, टेल लाईट इत्यादी कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले. योग्यता प्रमाणपत्र नसतानाही वाहनचालक-मालक २३० बसगाड्या चालवित असल्याचे निदर्शनास आले. सध्या दिवाळी सुरू असून मुंबई महानगर, तसेच राज्याच्या विविध भागातील प्रवासी मोठ्या प्रमाणात खासगी बसगाड्यांमधून प्रवास करीत आहेत. नियमांची पायमल्ली करण्यात आलेल्या बसगाड्या प्रवाशांसाठी धोकादायक ठरू शकतात आणि हे होऊ नये यासाठी प्रशासन यंत्रणा काळजी घेत आहे.

दखल न्यूज महाराष्ट्र.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!