संगमेश्वर : तालुक्यातील कडवई जि.प. गटातील गरीब व गरजू कुटुंबातील नागरिकांची दिवाळी गोड करण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी फराळाचे वाटप केले आहे. यावेळी वृद्ध, दिव्यांग तसेच अनेक उपेक्षित घटकांच्या घरी जाऊन भाजपा कार्यकर्त्यांनी हे वाटप केल्याने अनेक कुटुंबांना आधार वाटला आहे.

तालुका सरचिटणीस डॉ. अमित ताठरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गुरव, शक्तीकेंद्र प्रमुख नरेंद्र गुरव व अविनाश चव्हाण यांनी 'शिवभावे जीवसेवा' या उक्तीनुसार कार्य केल्याने लाभार्थ्यांनी त्यांचे कौतुक करत आभार मानले. यावेळी अविनाश गुरव यांनी मनोगत व्यक्त केले. पंतप्रधान मोदी साहेबांच्या प्रेरणेने अंत्योदयासाठी अविरत प्रयत्न करीत राहू. त्यासाठी समाजातील पुढारलेल्या वर्गाने याकामी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.








