रत्नागिरी : तीन महिन्यांचे बाळ ते 14 वर्ष वयोगटातील तब्बल 40 मुलांवर हर्निया, अपेंडीक्स, जननेंद्रीयांचे आजारांवर रत्नागिरीत मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ना. उदय सामंत यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून जिल्हा शासकीय रुग्णालय आणि सायन हॉस्पिटलच्या संयुक्त उपक्रमातून हा शस्त्रक्रिया पार पडल्या. चार मुलांवर मुंबई येथे शस्त्रक्रिया होणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तींवर मुंबईसह अन्य तज्ज्ञ डॉक्टरांनी रत्नागिरीत येऊन उपचार केल्यास येथील जनतेला त्याचा मोठा फायदा होईल अशा भावना उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केल्या.
जिल्हा शासकीय रुग्णालयात 20 जानेवारीपासून तीन दिवस एक ते 18 वयोगटातील बालकांसाठी हर्निया, अपेंडीक्स, जननेंद्रीयांचे आजार व हायड्रोसील याबाबतची शस्त्रक्रियांचे आयोजन सायन हॉस्पीटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने करण्यात आले होते. तीन दिवसात 40 मुलांवर सायन हॉस्पीटलच्या डॉ. पारस कोठारी, डॉ. शहाजी देशमुख, डॉ. मैत्रेयी सावे, डॉ. आकृती, डॉ. श्वेता व डॉ. प्रियंका व कर्मचारी यांनी केल्या. यामध्ये एका तीन महिन्याच्या बालकावरही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तर चारजणांवर मुंबईत शस्त्रक्रिया लवकरच मोफत होणार आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनीही या शिबिरासाठी सोयीसुविधा सायन हॉस्पीटलच्या पथकाला उपलब्ध करुन दिल्या होत्या. राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाच्या पथकानेही या शस्त्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. ना. सामंत वैद्यकीय मदत कक्षाचे महेश सामंत व सागर भिंगारे यांनी शस्त्रक्रिया व तपासणीसाठी आलेली मुले व त्यांच्या पालकांना सोयीसुविधांचा अभाव राहणार नाही याची दक्षताही घेतली होती.
या वैद्यकीय पथकाची पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले. डॉ. कोठारी व त्यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी रत्नागिरीत येऊन जिल्ह्यातील नागरिकांसाठी वेळ दिल्यास येथील नागरिकांच्या आरोग्याच्या अनेक समस्या सोडवण्यात यश येईल. तज्ज्ञ डॉक्टरांअभावी अनेकदा हजारो रुपये नागरिकांना शस्त्रक्रिया व आरोग्यांवर खर्च करावे लागतात ते वाचतील व त्यांना योग्य उपचार मिळतील अशा भावना यावेळी ना. सामंत यांनी व्यक्त केल्या.

▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.