राजकीय

संगमेश्वर तालुक्यातील माखजन येथे शिवसेनेला खिंडार, भाजपमध्ये प्रवेश.

संगमेश्वर : माखजन विभागात भाजपाने ठाकरे गटाचा करेक्ट कार्यक्रम करून शिवसेनेला खिंडार पाडले. ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी आंबव येथे भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन वाहळकर, संगमेश्वर तालुका अध्यक्ष प्रमोद अधटराव  ओबीसी सेल चे जिल्हाध्यक्ष अभिजीत शेट्ये जिल्हा प्रसिध्दी प्रमुख उमेश कुळकर्णी यांच्या उपस्थितीत प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.
          माखजन विभागात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटात कमालीची अस्वस्थता व नाराजी आहे. यामुळेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते व विभागप्रमुख मनू शिंदे आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. आता आंबव येथील कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील भाजपा नेते उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला आकर्षित होत भाजपात प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे सचिन वाहळकर आणि प्रमोद अधटराव यांनी पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. तसेच कार्यकर्त्यांवर संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामध्ये ओबीसी तालुका उपाध्यक्ष सुधाकर घडशी, मुंबई संपर्क प्रमुख संदेश जोगळे, सोशल मीडिया माखजन गट प्रमुख अमोल नेटके, महिला मोर्चा व बूथ कमिटी प्रमुख विमल घडशी आदींचा समावेश आहे.
           या कार्यक्रमाला  चिपळूण नागरि पतसंस्थेंचे संचालक राजन पटवर्धन ,नगरसेवक यशवंत गोपाळ,बावा जड्यार, प्रशांत रानडे, मोहन घडशि ,संदेश पोंक्षे, भाऊ कोकाटे, तसेच तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी भाजपवरील दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू व माननीय मोदींना अभिप्रेत ग्राम स्तरावर काम करून केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या योजना गावातील लोकांपर्यंत पोहचूया असे  आवाहन जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर यांनी केले.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!