बातम्या

पद्मश्री दादा इदाते यांच्या सन्मानार्थ दापोलीत निघाली सायकल फेरी.

दापोली : कोकणचे रत्न म्हणून ओळख निर्माण केलेले भिकू रामजी इदाते (दादा इदाते) यांना केंद्र सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. दादांचे सामाजिक काम पाहता त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दादांच्या या समाजकार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लबतर्फे रविवार १२ फेब्रुवारी २०२३ रोजी सायकल फेरी काढण्यात आली.
         या सायकल फेरीचे नियोजन करण्यात आमोद बुटाला, केतन पालवणकर, सर्वेश बागकर, संदीप भाटकर, विनय गोलांबडे, प्रशांत पालवणकर, श्रीराम इदाते आदींनी मोलाची भूमिका बजावली. सायकल संस्कृती वाढावी व सायकल बद्दल आवड निर्माण व्हावी या हेतूने दापोली सायकलिंग क्लबतर्फे विनामूल्यपणे सायकल विषयक अनेक उपक्रम राबवले जातात. सर्वांनी यामध्ये सहकुटुंब, सहपरिवार सहभागी व्हा आणि आपल्या दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!