प्रतिनिधी : राम भोस्तेकर
कुणबी सेवा चॅरीटेबल ट्रस्ट मुंबई. लोणेरे गोरेगाव माणगाव महिला मंडळ सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आली होती. या सभेसाठी एकुण २० महिला भगिनी उपस्थित होत्या. सभेत सुरवातीला सभेच्या अध्यक्षांची निवड करण्यात आली. सुजाता संतोष आवाद यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. सभेच्या सुरवातीला उपस्थितांच स्वागत करण्यात आले. यावेळी सदर सभेत कौटुंबिक मेळावा,हळदी कुंकू सांस्कृतिक कार्यक्रम आणि सत्कार समारंभ विषयांवर साधकबाधक चर्चा सर्वानुमते करण्यात आली. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी त्यांनी ज्यांनी योगदान दिले त्यांचे शब्द सुमानाने त्याचे कौतुक करण्यात आले. तसेच बचत गट या विषयावर चर्चा करण्यात आली छोटा मोठा उद्योग व्यवसाय विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वांच्या उपस्थितीत आनंदात खेळी मेलीच्या वातावरणात हि सभा संपन्न झाली. या सभेसाठी नितीन शिंदे यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली, त्यांचे शुध्दा महिला मंडळाच्या वतीने आभार मानले.नतर सभा खेळीमेळीने संपन्न झाल्याचे अध्यक्षा सुजाता संतोष आवाद जाहीर केले.
यावेळी सभेस मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा प्रकाश मोरे,वसुधा निलेश सत्वे ,प्रणाली नितीन मोरे ,विद्या गणेश सत्वे
ज्योती संतोष मोरे, नियती नितीन शिंदे,सारिका अशोक पालकर,अश्विनी आनंद पालकर, शालिनी केशव निंबरे, वैदही विकास करकरे, लतिका लक्ष्मण गंभीर,उर्मिला समीर गवसकर,कविता विलास उभारे ,सुजाता संतोष आवाद, श्वेता विनायक काप, सृष्टी सखाराम आवाद,रूपाली मधुकर मोरे, मिलन महेश महादे,स्नेहा संदीप ढेपे,मंगला सुभाष तेटगुरे,आदी महिला सभासद उपस्थित होत्या सर्व उपस्थित महिलांच अध्यक्षा प्रतिभा प्रकाश मोरे यांनी आभार मानले. आणि सभा संपल्याचे जाहीर केले.
दखल न्यूज महाराष्ट्र.
