बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी महिलांच्या वतीने सामान्य कुटुंबातील असामान्य नारीशक्तीचा सन्मान..

रत्नागिरी : सन्मान कर्तुत्वाचा , सन्मान स्त्री शक्तीचा !!
जागतिक महिला दिनानिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी महिलांच्या वतीने सामान्य कुटुंबातील असामान्य नारीशक्तीचा सन्मान करण्यात आला . कुवारबाव येथील सौ निता सुधाकर सुर्वे यांचा यशस्वी उद्योजीका म्हणुन शाल श्रीफळ सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला .
निता सुर्वे यांचे माहेरचे नाव शोभा गणपत शिरोडकर असुन राजापुर तालुक्यातील दोनिवडे त्यांचा जन्म झाला . दहावी पर्यंतचे शिक्षण झाले . घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे कष्टाकडे त्यांचा कल होता . १९८३ साली कुवारबाव येथील भंडारी कुटुंबातील सुधाकर विठोबा सुर्वे यांच्याशी विवाह झाला . सुधाकर सुर्वे त्यावेळी आंबा आणि काजू बी चा किरकोळ विक्रीचा व्यवसाय करीत असत . लग्नानंतर सौ निता त्यांना व्यवसायात मदत करु लागली . कष्ट जिद्द प्रामाणिकपणा मुळे शे पाचशेंचा व्यवहार हजारो पुढे लाखात जावुन आता कोटीत गेला . कामगारांपासुन व्यापाऱ्यांपर्यंत सलोख्याची वागणुक असल्यामुळे व्यापार वाढत गेला . नातेकाईकांपासुन सगळ्यांचीच चांगली साथ मिळाल्यामुळे ३७ वर्षात मागे पहावे लागले नाही . मुलगा आणि मुलगी दोन्ही आता व्यवसायात मदत करतात . मुलांच्या मदतीने ४००० आंब्यांच्या कलमांची लागवड झाली . अनेक बरेवाईट प्रसंग वाट्याला आले परंतु न डगमगता धीराने तोंड देत मार्गक्रमण करीत आलो आहोत त्यात प्रमेश्वराचे भरभरुन पाठबळ मिळाले असल्याचे त्या सांगतात . माझ्या सोबत पती सुधाकर यांचे प्रचंड कष्ट फार मोलाचे ठरले आहेत . धार्मिक सामाजीक कार्यातही सुर्वे कुटुंब मागे रहात नाही .
आज महिला दिनाच्या निमित्ताने शुन्यातुन विश्व निर्माण करणाऱ्या सौ निता सुधाकर सुर्वे यांचा त्यांच्या घरी जावुन सत्कार करण्यात आला यावेळी माजी नगरसेविका सौ अस्मिता चवंडे , मा. नगरसेविका संपदा तळेकर , विजया घुडे ,सुवर्णा शिरधनकर ,अमृता मायनाक , तनया शिवलकर , उर्मिला तळेकर , वैदेही खडपे , रंजना विलणकर , राजीव किर, दिलीप भाटकर , अशोक मायनाक , आर के विलणकर आदी उपस्थित होते . दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!