बातम्या

रत्नागिरी मनसेच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त आज दिनांक ९ मार्च २०२३ रोजी “गाव तिथे शाखा”  अभियानांतर्गत रत्नागिरी तालुका मनसेच्या वतीने तालुक्यातील जि.प.गटनिहाय पावस, कोकणनगर, मजगाव रोड (चर्मालय ), हातखंबा येथील शाखांच्या नामफलकाचे अनावरण येथील शाखाअध्यक्षांच्या हस्ते आज करण्यात आले. तसेच रत्नागिरी शहरात मनसेच्या वतीने रत्नागिरी नगरपरिषद शाळेतील १००हून जास्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.


             याप्रसंगी मनसे द. रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेशजी सावंत, रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री.रूपेशजी जाधव, रत्नागिरी शहर अध्यक्ष श्री. सतीशजी राणे, तालुका उपाध्यक्ष श्री. राजू पाचकुडे, महिला सेना तालुकाध्यक्ष सौ. प्रियांकाताई आखाडे, शहरअध्यक्ष सौ. अंजलीताई सावंत, तालुका उपाध्यक्ष सौ. द्वारकाताई नंदाणे, शहर उपाध्यक्ष श्री. अमोल श्रीनाथ, श्री. अनंत शिंदे, विभाग अध्यक्ष श्री. प्रणाम शिंदे, र्श्री.जयेश फणसेकर, श्री. सागर पावसकर,  श्री. सोम पिलणकर,  श्री. नवनाथ साळवी, श्री. यश पोमेंडकर,  श्री. विशाल चव्हाण, श्री. सर्वेश जाधव, श्री. राहुल खेडेकर आदींसह  रत्नागिरी तालुक्यातील व शहरातील मोठ्या संख्येने पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात….

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!