प्रतिनिधी : माणगांव, राम भोस्तेकर
माणगांव : मागील काही दिवसांपूर्वी लोणे रे विभागातील तळेगांव तर्फे गोरेगाव हद्दीत येणाऱ्या रेपोली गावातील बौद्धवाडी मधील ग्रामस्थ आणि महिला भगिनी यांनी .महाड पोलादपूर माणगांव चे आमदार तथा शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद आम.भरत गोगावले यांच्या कार्यप्रणाली वर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला होता.आणि आता १८ मार्च रोजी सायंकाळी पुन्हा एकदा लोणेरे विभागातील रेपोली ग्रामस्थ यांनी आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला आहे.

यावेळी आमदार गोगावले यांनी रेपोली ग्रामस्थांचे शिवसेना पक्षात स्वागत करताना ग्रामस्थ आणि महिला भगिनींंसमोर मार्गदर्शन करताना सांगितले की आम्ही या भागातील प्रत्येक गावात सर्व विकासकामे जोमाने करत असताना तुम्ही मात्र दुसऱ्या पक्षात थांबून राहिल्यामुळे विकास कामांपासून अध्याप वंचित राहिला आहात, आता जर आपण आमच्या शिवसेना पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे तर प्रथम आपली नळपाणी पुरवठा योजना पूर्ण करू, जेणेकरून महिला भगिनींचा डोक्यावरील हंडा खाली येऊन पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल .तसेच आपली जी काही उर्वरित विकास कामे आहेत ती देखील आपण पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असणार .! यात शंका नाही, असे आमदार म्हणाले..

आपण एव्हड्या वर्षे राष्ट्रवादी पक्षात राहून एक प्रकारे या पक्षातील नेत्यांनी तुमची फसवणूकच केली असे म्हणले तर चुकीचे ठरणार नाही, आपण या पक्षात आलात आपली फसवणूक तर होणार नाहीच, आपणास सन्मानाचीच वागणूक दिली जाईल असे गोगावले यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले, यावेळी रेपोली ग्रामस्थांनी प्रवेश करतेवेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की ,जर आमच्या गावातील सर्व विकासकामे शिवसेनेच्या आणि आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून होत असतील तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कशासाठी थांबायचे ?असा सवाल उपस्थित करत पुढील भविष्याचा विचार करून आम्ही सर्वजण शिवसेनेत प्रवेश करत आहोत असे रेपोली ग्रामस्थ प्रवेशकर्त्यांनी सांगितले.
या पक्षप्रवेश समारंभावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरुण चाळके ,युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे, तालुकाप्रमुख ऍड महेंद्र मानकर, विभाग प्रमुख रवी टेंबे, प्रकाश टेंबे ,माणगाव शहर प्रमुख सुनील पवार , रेपोली शाखाप्रमुख रघुनाथ बेंदुगडे तसेच लोणेरे गोरेगाव विभागातील शिवसेना युवासेनेचे या विभागातील आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी व शिवसेना पुरस्कृत विविध आघाड्या व विविध सेल यांचे पदाधिकारी आणि बहुसंख्येने रेपोली ग्रामस्थ महिला मंडळ उपस्थित होते. फोटो-( छायाचित्रात रेपोली ग्रामस्थांचे शिवसेनेत स्वागत करताना आमदार भरत गोगावले व शिवसेना दक्षिण रायगड पदाधिकारी दिसत आहेत.(छाया- राम भोस्तेकर लोणेरे)
