बातम्या

महाड चवदार तळे येथे मुख्यमंत्री नाम. एकनाथ शिंदे यांचा पंकज तांबे व स्वप्निल शिर्के यांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती व भारतीय संविधान प्रत देऊन सन्मान.

प्रतिनिधी : राम भोस्तेकर (लोणेरे).

हा संगर केवळ पाण्यासाठी नसून अखिल मानव जातीच्याव मूलभूत हक्कांसाठी आहे ..! अशी सिंह गर्जना करत समाजातील दिन दुबळे दलित आणिअस्पृश्य यांसाठी चवदार तळ्यातील पाणी खुले करून दिले ते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी या रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळ्याचा 96 व्या सत्याग्रह वर्षपूर्ती दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे हे रविवार दि.19 मार्च 2023 रोजी चवदार तळे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी रात्री अकरा वाजता रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील गोळीबार मैदानातील सभा संपवून आले.

जाहिरात..

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यावेळी माणगांव तालुका पबौद्ध धम्म सामाजिक संस्थेचे संस्थापक तथा अध्यक्ष व स्वराज्य संघटना माणगांव चे संस्थापक पंकज तांबे व संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्निल शिर्के यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांना अवघ्या जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले भारतीय संविधान यांची प्रत देऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम एकनाथ शिंदे यांचा पंकज तांबे यांच्याहस्ते सन्मानपूर्वक यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी सन्मान करताना मुख्यमंत्री नाम.एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाड, माणगांव, पोलादपूर विधानसभेचे आमदार व शिवसेना विधिमंडळ पक्ष प्रतोद व शिवसेनेचे उपनेते आमदार भरत गोगावले, युवा सेना महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले, बौद्ध धम्म भिक्कू गण, भीम अनुयायी व मोठया संख्येने शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. फोटो-(महाड चवदार तळे येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नाम एकनाथ शिंदे यांचा भगवान गौतम बौद्ध व भारतीय संविधान प्रत देऊन सन्मानित करताना बौद्ध धम्म सामाजिक संस्था माणगांव चे संस्थापक पंकज तांबे दिसत आहेत.(छाया-/लोणे रे.माणगांव.) दखल न्यूज महाराष्ट्र..

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!