बातम्या

“कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ” या संस्थेच्या वतीने दिनांक दिनांक २५ मार्च , २०२३ रोजी भव्य “कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद २०२३ चे आयोजन .

प्रतिनिधी : राम भोस्तेकर माणगाव

कुणबी समाज नेते आणि कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या समाजाच्या बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अशोक वालम आणि अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ” राम गणेश गडकरी रंगायतन , ठाणे येथे दिनांक २५ मार्च , २०२३ रोजी भव्य ” कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद २०२३ चे आयोजन करण्यात आलेले आहे . या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उद्योग मंत्री . उदय सामंत अन्य पीछडा बहुजन कल्याण मंत्री . अतुलजी सावे , कुणबी समाजोन्नती संघ मुंबईचे अधक्ष भूषण बरे साहेब हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत .सदरची परिषद सकाळी ०९.०० ते ०२.०० वाजता च्या दरम्यान होणार आहे .

जाहिरात…


कुणबी समाज हा फार मोठ्या प्रमाणात असूनही तो आर्थिक दृष्ट्या फारच मागासलेला आणि विखुरलेला आहे .
समाजातील व्यवसायिकांना एका सक्षम व्यासपीठावर आणून समाजाला आर्थिक व व्यवसायिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या संस्थे मार्फत अनेक शासकीय योजना राबविण्याचे काम या संस्थे मार्फत केले जाते . या संस्थेला अल्पावधीतच मुबई , मुंबई उपनगरे , संपूर्ण कोकण , पालघर , ठाणे , कल्याण -डोंबिवली ,शहापूर आणि पुणे परिसरातील कुणबी बांधवांनी उदंड प्रतिसाद दिला आहे .
समाजाला उद्योग व व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करणे आणि त्यातूनच सामजिक , सांस्कृतिक , शैक्षणिक , पारंपरिक शेती / आधुनिक शेती , वैद्यकीय आणि क्रीडा क्षेत्रात समाज क्रांती घडविण्याचे काम या संस्थे मार्फत करण्यात येणार आहे . कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेत समाजातील दिग्गज , लहान मोठे व्यवसायिक / उद्योजक तसेच नव व्यवसायिक मोठ्या संख्येने सभासद झालेले असून त्यांना व्यवसायिक मार्गदर्शन मिळावे या साठीच ही कुणबी उद्योजक प्रोत्साहन परिषद २०२३ चे आयोजन करण्यात आलेले आहे .
।आज महाराष्ट्रात अनेक उच्चशिक्षित तरुण , तरुणी नोकरी नसल्याने बेकार आहेत . नोकर बनून राहण्यापेक्षा मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार या युक्तीने जास्तीत जास्त समजतील तरुण आणि तरुणीने उद्योग / व्यवसायात खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन संस्थे मार्फत करण्यात येत आहे . संस्था त्यांच्या मागे खंबीरपणे उभी राहील असे आश्वासन संस्थेचे अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे यांनी दिले आहे . समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला तर समाजाच्या प्रगतीला कोणीही थांबवू शकणार नाही याची खात्री संस्थेच्या अध्यक्षांना आहे ही परिषद कुणबी समाजासाठी खुली असल्याने जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुणबी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज संस्थेचे अध्यक्ष प्रेमनाथ ठोंबरे व उपाध्यक्ष प्रकाश टी भोस्तेकर यांनी केले आहे .

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!