खेड : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी ९ रंग कलामंच,मुंबई यांच्या कडून खेड तालुक्यातील कळंबणी,तसेच दापोली तालुक्यातील किन्हळ येथील शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले.त्यावेळी शाळेतील शिक्षकवर्ग,ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.दोन्ही शाळेतील शिक्षकवर्ग ग्रामस्थ आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी ९ रंग कलामंचच्या प्रतिनिधींचे खूप छान पद्धतीने स्वागत केले.तसेच कलामंचच्या या उपक्रमाचे कौतुक केले.कलामंच चे अध्यक्ष सागर नांदलजकर यांनी या उपक्रमामध्ये कलामंचला सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच अभिनय क्षेत्रातील काही महत्वाचे दुवे उलगडून सांगितले.या उपक्रमात ९ रंग कलामंचच्या सागर नांदलजकर, अमोल माईन,प्रथमेश पत्की, सुशील येरापले,सुखदेव पाटील यांनी सहभाग घेतला होता. दखल न्यूज महाराष्ट्र
