रत्नागिरी – (प्रमोद तरळ) सद्या कोकणात बिबट्याची दहशत बरीच वाढली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार असल्यामुळे ये-जा करताना लोकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
या गोष्टीचा विचार करून पितळेवाडी ग्रामस्थ मंडळाचे सेक्रेटरी,उत्कर्ष कुणबी संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेशजी पितळे*यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली दाभोळे पितळे वाडीतील ग्रामस्थ एकवटले. शासनाच्या निधीची वाट न बघता स्वखर्चाने त्यांनी वाडीतील रस्त्यावर १० सोलर स्ट्रीट लाईट बसवून वाडीतील ग्रामस्थांना चांगली सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे सर्व लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कामासाठी मुंबई मंडळाचे पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांनी आपले योगदान दिले. सोलर स्ट्रीट लाईट चे रविवार दिनांक १८/०६/२०२३ रोजी सकाळी उद्घाटन सोहळा पार पडला. सदर कार्यक्रमाला मुंबईतून सुरेश पितळे,जयराम पितळे,दत्ताराम पितळे,प्रकाश पितळे विजय पितळे तसेच गावकर दत्ताराम पितळे, जयेश पितळे, तानाजी पितळे, आत्माराम पितळे, रमेश पितळे, प्रकाश पितळे, संजय पितळे,संतोष पितळे,संदीप पितळे आणि महिला मंडळ हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. दखल न्यूज महाराष्ट्र
