योगी आदित्यनाथ ४३% मातांसह सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री..
2024 च्या लोकसभा निवडणुकीतील जागांच्या संदर्भात इंडिया टुडे-सीव्होटर मूड ऑफ द नेशनचं सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे. ज्यामध्ये देशातील सर्व राज्यांतील जनतेचा कौल जाणून घेण्यात आला. या सर्वेक्षणात लोकसभेतील जागांच्या मुल्यांकनासह भारताच्या 30 मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीचं मूल्यांकन करण्यास सांगितलं होतं. ज्यामध्ये एकूण 134,487 लोकांनी सहभाग घेतला आणि त्यांचा लोकप्रिय मुख्यमंत्री निवडला.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या भारताचे सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचं सर्वेक्षणाच्या निष्कर्षातून स्पष्ट झालं आहे. 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान झालेल्या या सर्वेक्षणात लोकांना विचारण्यात आलेलं की, त्यांच्या मते देशाचा सर्वोत्तम मुख्यमंत्री कोण? याला प्रत्युत्तर म्हणून जास्तीत जास्त 43 टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांना भारताचे नंबर 1 मुख्यमंत्री म्हटलं आहे. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) यांना दुसरं स्थान मिळालं आहे. या महिन्यात जाहीर झालेल्या सर्वेक्षणात असं दिसून जालं की, 19 टक्के लोक केजरीवाल यांना लोकप्रिय मुख्यमंत्री मानतात, मात्र, याच प्रश्नावर जानेवारी 2023 मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार योगी आदित्यनाथ यांची लोकप्रियता 4 टक्क्यांनी वाढली, तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना तीन टक्के कमी मतं मिळाली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे त्यांना एकूण 8.8% मत मिळाले आहेत. तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टालिन हे चौथ्या क्रमांकावर असून त्यांना केवळ 5.6% मोठं मिळाली आहेत. तर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे तीन टक्के मतांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र देशातील पाच टॉप मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश झालेला नाही. दखल न्यूज महाराष्ट्र.

