रत्नागिरी : तालुक्यातील सैतवडे या गावातील समायरा रुमान पारेख या ८ वर्षीय चिमुकलीची गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पर्यंत मजल पोहोचली आहे. टिंकर एप आणि त्यांचे ऑफिशियल यूट्यूब चैनल आयोजित एरोप्लेन आणि त्यांची टेक्नोलॉजी कशी काम करते हे लहान मुलाना समजावे आणि लहान वयातच मुलानी खरी खुरी विमाने तयार करून ती उडवण्यास शिकावे जेणे करून ही मुले भविष्यात पायलट किवा एरोनॉटिकल इंजिनीयर होवू शकतील अशा पहली उडान या कार्यशाळेत समायराने नुसता भाग नाही घेतला तर त्यात ती यशस्वी सुद्धा झाली आणि अवघ्या ८ वर्षी तिचे नाव गिनिज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाले.
सैतवडे गावतीलच नाही तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील समायरा ही एवढ्या कमी वयात गिनिज बूक मध्ये नाव नोंद होणारी पहिलीच चिमुकली ठरली आहे. तिच्या ह्या यशाचे श्रेय समायरा हीने तीच्या संपूर्ण कुटूंबीयाना दिले आहे. संपूर्ण सैतवडे गावचे नाव गिनिज बूक पर्यंत नेल्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.
