राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मुंबई- गोवा महामार्गालगत वसलेल्या मौजे मंदरूळ गावांमध्ये अखंडितपणे 60 वर्षे दहीहंडीचा उत्सव साजरा होत आहे गाव प्रमुख श्री परशुराम भानू मासये यांचे चुलते व श्री नारायण जानू मासये यांचे वडील कैलासवासी जानू गोविंदा मासये यांनी आणि 1952 साली विठ्ठलादेवी गोविंदा पथकाची स्थापना करून गावांमध्ये दहीहंडी उत्सव सुरू केला. त्यांचा वारसा त्यांचे पुत्र व पुतन्या यांनी अखंडितपणे आजपर्यंत चालू ठेवला आहे. संपूर्ण गावातील लहान थोर मंडळींना एकत्र करून दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो. प्रथम आई विटादेवीच्या मंदिरामध्ये जमून त्या ठिकाणी दहीहंडीला सलामी देऊन श्री जानू गोविंदा मासये यांच्या घराजवळची मानाची हंडी फोडली जाते. त्यानंतर झरेवाडी येथील पिंपळपार या ठिकाणी बांधलेली हंडी मोठ्या उत्साहाने फोडून गोविंदा पथक तीवंदा माळ कडे रवाना होते. तत्पूर्वी मैत्री कट्टा या ठिकाणची हंडी फोडून गणेश मंदिराजवळील हंडी फोडून पुन्हा आई विठ्ठलादेवीच्या मंदिराजवळ येऊन मंदिराजवळची हंडी फोडली जाते. दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील स्त्रिया मोठ्या उत्साहाने हजेरी लावतात. मंदिरात आल्यानंतर सर्व गोविंदांना प्रसाद वाटप केले जाते व दहीहंडीचा कार्यक्रमाची सांगता केली जाते. गेली साठ वर्षे चालू असणार हा कार्यक्रम निर्विघ्नपणे आज पर्यंत कोणताही तंटा किंवा कोणत्याही गोविंदाला दुखापत झालेली नाही याचे मुख्य कारण म्हणजे संपूर्ण गावातील लोक एकोप्याने आणि गुण्यागोविंदाने आनंदाने एकत्र नांदत आहेत. एकीचे हेच बळ कायम रहावे यासाठी गावातील प्रमुख मंडळी नेहमी आग्रही असतात. ही परंपरा पुढेही अशी अखंडितपणे चालू ठेऊ असे या इथल्या तरुणांचे प्रांजळ मत त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे श्री जानू गोविंद मासये यांनी सुरू केलेली दहीहंडीची परंपरा अखंडितपणे पुढे चालू राहील यात कोणतीही शंका नाही. दहीहंडीच्या कार्यक्रमादिवशी गावातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही कामासाठी जात नाही. संपूर्ण गावातील ग्रामस्थ या दहीहंडीच्या उत्सवामध्ये आनंदाने सामील होतात. मंदरूळ गावातील मंडळींचा एकोप्याचा गुण हा फुटीर व फोडाफोडी करणाऱ्या समाज घटकांना एक आदर्श घेण्याजोगा आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

