राजापूर – (प्रमोद तरळ) दि. ७ शहरानजीकच्या कोंढे तर्फ राजापूर ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कोंढे तर्फे राजापूर ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच सरपंच मनाली तुळसवडेकर यांच्या अध्यक्षस्थानी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली आहे.
अरविंद लांजेकर हे गेली अनेक वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रात सक्रीय आहेत. त्यांनी यापुर्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंचपदही भुषविले आहे. तर काही काळ सरपंच म्हणून पद्भार सांभाळला आहे. त्यांना प्रशासकीय कामाचा असलेला अनुभव आणि गावच्या विकासाची तळमळ लक्षात घेवून त्यांची तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.
आपल्या पदाच्या माध्यमातून आपण गावात सामाजिक सलोखा राखण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे श्री. लांजेकर यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले. या निवडीबद्दल श्री. लांजेकर यांचे अभिनंदन होत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
