शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रावे अंतर्गत काही उपक्रम राबवण्यात आले जिल्हा परिषद मराठी शाळा काणे येथे कृषी प्रदर्शन आणि रानभाज्या व पाककला स्पर्धा या ठिकाणी घेण्यात आल्या यामध्ये गावातील अनेक लोकांनी सहभाग घेतला यावेळी गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आणि जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर स्टाफ उपस्थित होते रानभाज्या स्पर्धेमध्ये गावातील अनेक लोकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमात शेवटी कृषी दिंडी काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी गावातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे विद्यार्थ्यांनी देखील त्यांचे आभार मानले.
रावे अंतर्गत या उपक्रमामध्ये हितेश खिल्लारी, शार्दूल देवकर, मंदार कावणकर, साहील तोडणकर, प्रज्योत ठाकूर, आदित्य मोहिते आदी विद्यार्थ्यांचा समावेश होता. दखल न्यूज महाराष्ट्र.
