कार्यालयीन वेळेत अधिकारी व कर्मचारी भेटीदरम्यान 100% उपस्थिती; घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव जलद गतीने सादर करण्यासंदर्भात दिले अधिकाऱ्यांना निर्देश.
विजय शेडमाके
गडचिरोली
चामोर्शी : तालुक्यातील जनतेच्या मागणीनुसार आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी कोणत्याही अधिकाऱ्याला सूचना न देता आकस्मिकपणे पंचायत समितीच्या कार्यालयाला भेट दिली. यावेळी कार्यालयीन वेळेत कर्मचाऱ्यांची १००% उपस्थिती दिसून आल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी समाधान व्यक्त केले.अधिकारी व कर्मचारी यांनी जनतेच्या कामे कुठलीही निष्काळजी न करता सहकार्याच्या भावनेने कार्यालयीन कामे वेळेत पुर्ण करावे असे निर्देश दिले.
तालुक्यातील गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ मिळवून देण्यासंदर्भात मोदी आवास योजना, शबरी आवास योजना आदी घरकुलांच्या कामाची गती वाढवण्याची आवश्यकता असल्याचे उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी संवर्ग विकास अधिकारी सागर पाटील, जिल्हा सचिव दिलीपजी चलाख, युमो तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, उमेश पिटाले ताथा अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.