आपले आरोग्य आणि वेळ,पक्ष संघटन, भरभराटीसाठी अतिशय महत्वपूर्ण,योगदान खा.नेते.
विजय शेडमाके
गडचिरोली.
गडचिरोली:- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश किसान मोर्चा चे सचिव मान.रमेशजी भुरसे
यांचा वाढदिवस दिनांक १०ऑक्टोबर रोजी गडचिरोलीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्राम गृहामध्ये साजरा करण्यात आला. शुभेच्छा देतांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांनी म्हणाले,पक्षाची खूप मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे.सर्वांना सोबत घेऊन समन्वय साधून पक्ष मजबूत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील आहात.आपले आरोग्य आणि वेळ पक्षासाठी महत्वाचे आहे.पक्ष संघटनेत योगदान महत्वपुर्ण आहे.आपला स्वभाव आणि कार्याचे कौतुक करून खासदार अशोकजी नेते यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत जी वाघरे,जिल्हा महामंत्री प्रकाश गेडाम, किसान मोर्चा चे जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,शहर महामंत्री विनोद देवोजवार, माजी न.प.उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,केशव निंबोड, देवाजी लाटकर,श्याम वाढई, संजय मांडवगडे,दतु माकोडे, विलास नैताम,तसेच भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.