मुंबई – (प्रमोद तरळ) राज्य शासनाने दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकाप्रमाणे सहकारी व खासगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत. आज राज्यभर दिनांक २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परीपत्रकाची रेठरेधरण ता. वाळवा जि. सांगली येथे शेतकरी बांधवांना सोबत घेऊन होळी करण्यात आली. शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर राज्यामध्ये दूध आंदोलनाचा भडका उडेल असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला. यावेळी डी.के. पाटील, युवा नेते अमोल पाटील, सरपंच संदीप खोत, प्रशांत पाटील, सुहास पाटील, महादेव खोत, योगेश शिंगाडे व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
- Home
- शासनाने दूध दरात वाढ करावी अन्यथा आंदोलनाचा भडका उडेल – माजी मंत्री सदाभाऊ खोत