विजय शेडमाके, गडचिरोली
दिनांक २६ नोव्हेंबर २०२३
आज दिनांक २६ नोव्हेंबर ला संविधान दिनाचे औचित्य साधुन गडचिरोली- चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या चामोर्शी रोड स्थित जनसंपर्क कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तथा संविधान प्रास्ताविकास पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले.
या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते रमेशजी भुरसे, भाजपा शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, कामगार आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर पेटकर, दलित आघाडी जिल्हा महामंत्री जनार्धन साखरे, भाजपा जिल्हा सचिव सौ. वर्षाताई शेडमाके उपस्थित होते.