बातम्या

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांचा कारवी फाउंडेशन कडून सन्मान.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांना कारवी फाउंडेशनच्या चौथ्या वर्धापनदिनी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नुकत्याच या सन्मान सोहळ्याचे आयोजन आकुर्डे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे संपन्न झाले. डॉ. पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक व संशोधनकार्यातील योगदानाबद्दल हा सन्मान करण्यात आला. डॉ. सरदार पाटील हे मूळचे पणुत्रे, ता. पन्हाळा गावचे रहिवासी असून ते सध्या देवरुख येथील आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयामध्ये भूगोलशास्त्र विभागप्रमुख आणि उपप्राचार्य म्हणून कार्यरत आहेत. डॉ. पाटील सन २००८ मध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाले, तर सन २०१० मध्ये शिवाजी विद्यापीठाने विद्यावाचस्पती (Ph. D.) पदवी प्रदान केली. देवरुख महाविद्यालयात ते सन २००९ पासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून सेवेत रुजू झाले आणि २०२२ पासून उपप्राचार्य पदाची धुरा सांभाळत आहेत. महाराष्ट्र शासनाने सन २०२० पासून रत्नागिरी जिल्हा नॅक समन्वय समितीचे समन्वयक म्हणून त्यांची नेमणूक केली आहे. भू अभिक्षेत्रीय तंत्रज्ञानातील १२ प्रशिक्षण वर्ग आतापर्यंत पूर्ण केले आहे. डॉ. पाटील यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण २५ शोधनिबंध प्रकाशित झाले असून, त्यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत, ४५ परिषदांमध्ये त्यांनी संशोधनपर सादरीकरण केले असून तितक्याच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा आणि कार्यशाळांमध्ये प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले आहे. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६ विद्यार्थी पी.एच.डी प्रबंध सादर करण्यासाठी संशोधन करत आहेत. डॉ. पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेने २०१५ या वर्षी, तर सन २०२२ मध्ये ग्लोबल फाउंडेशनने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले आहे. डॉ. पाटील यांनी मिळवलेल्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभूदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो- उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांना सन्मानित करताना आमदार डॉ. विनय कोरे, स.पो.नी. रणजीत पाटील आणि दिनकर चौगुले.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!