बातम्या

कवयित्री वीणा विश्वास चव्हाण यांच्या “अजूनही काही भावतं तिला” या कवितासंग्रहाचे प्रकाशन..

मुंबई – (प्रमोद तरळ) कवयित्री वीणा विश्वास चव्हाण यांच्या “अजूनही काही भावतं तिला” या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह ‌ ( मिनी ), बोरिवली येथे जेष्ठ कवी, गीतकार श्री. प्रसाद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या प्रकाशन सोहळ्यास सुप्रसिध्द लेखक, दिग्दर्शक श्री. राजेश देशपांडे, मोडीदर्पण या दिवाळी अंकाचे संपादक श्री. सुभाष लाड, जेष्ठ साहित्यिक श्री. अशोक लोटणकर, जेष्ठ कवयित्री योगिनी राऊळ आणि कवी, संपादक श्री. गीतेश शिंदे आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या प्रकाशन सोहळ्यास शुभेच्छा देण्यासाठी अभिनेते प्रफुल सामंत, अभिनेते, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार व कवी संजय गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. दिनेश मोरे यांनी केले व नियोजन कवी विराज चव्हाण यांनी केले.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!