आमदार डॉ देवरावजी होळी
अमीर्झा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याचे केले उद्घाटन
विजय शेडमाके.
दिनांक ४डिसेंबर गडचिरोली
भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने महिलांना ३३% आरक्षण देण्याचा अभूतपूर्व कायदा करून व राज्यातील शिंदे, फडणवीस, पवार यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने शक्ती कायद्याच्या माध्यमातून नारीशक्तीचे सशक्तिकरण करण्याचा केलेला मोठा प्रयत्न व संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याचे आयोजन हे खरोखरच अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी अमीर्झा येथे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.
यावेळी मंचावर गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी साळुंखे ,तहसीलदार गणवीर साहेब, गटशिक्षणाधिकारी परसा मॅडम, स. प्र .अधिकारी पोरद्दिवार, डॉ. साळवे तालुका आरोग्य अधिकारी,सोनाली नागपुरे सरपंच अमिर्झा, रंजीता पेंदाम सरपंच मौशिखांब ,सरिता टेंभुर्णे सरपंच आंबेशिवणी डॉ. नरोटे तालुका कृषी अधिकारी ,नायब तहसीलदार चाकुलवारजी ,तलांडेजी ठाकरेजी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मंचावर उपस्थित होते