10 लाख नोकऱ्या देण्याची होती घोषणा..
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज देशातील 75 हजार तरुणांना दिवाळीचं गिफ्ट देणार आहेत. केंद्र सरकारनं 10 लाख नोकऱ्यांची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात आज देशातील 75 हजार बेरोजगारांना नोकरींचं नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे. विविध भरतीच्या विहित निवड प्रक्रियेतून निवडलेल्या या युवकांना नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात येणार आहे. केंद्रीय सशस्त्र बल, उपनिरिक्षक, कॉन्स्टेबल, स्टेनो, आयकर निरिक्षक या विविध पदांसाठी यूपीएससी, एमपीएससी, रेल्वे भरती बोर्डच्या माध्यमातून ही भरती केली जात आहे. पंतप्रधान मोदी आज व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नियुक्तीपत्र दिलेल्यांशी बातचित करणार आहेत. त्यामुळे देशभरातील बेरोजगार तरुणांची दिवाळी चांगली जाणार आहे.
व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान आज देशातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. यावेळी 75 हजार तरुणांना नोकरीच्या नियुक्तीचे पत्र देण्यात येणार आहे. पंतप्रधानांच्या ऑनलाईन कार्यक्रमात देशाच्या विविध भागांमधून केंद्रीय मंत्री सहभागी होतील. सत्तारुढ खासदारही आपापल्या मतदारसंघांमधून यामध्ये सहभागी होणार आहेत.
मुंबईत पियुष गोयल, मंगलप्रभात लोढा, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार रोजगार मेळा कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. पुण्यात यशदा सभागृहात आयोजित कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
केंद्राच्या विविध विभागांमध्ये अनेक पदे रिक्त होती. ती रिक्त पदे आता भरण्यात येत आहेत. बेरोजगारीवरुन विरोधी पक्षांतर्फे मोदी सरकारला घेरले जात होते. स्वातंत्र्यानंतर बेरोजगारीचा दर देशात सध्या सर्वाधिक आणि विक्रमी आहे अशीही टीका केली जात होती. देशातील सर्व मंत्रालये आणि विभागातील रिक्त जागांचा आढावा घेऊन मिशन मोडमध्ये ‘तरुणांना रोजगार’ या घोषणेच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे.

धनत्रयोदशीच्या व दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)

दखल न्यूज भारत.