रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांचा काल लांजा राजापूर असा संघटनात्मक दौरा संपन्न झाला. राजापूर पूर्व जिल्हा परिषद गट या ठिकाणी भेट देऊन तेथे सर्वभूतवर बूथ अध्यक्ष नेमणुका व संघटन वाढीसाठी कसे प्रयत्न करणे आवश्यक आहे; यासाठी राजेशजी सावंत यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
संघटना वाढविण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन काम केले पाहिजे तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणजेच केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांत पोहोचवून काम करा अशा सूचना जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी दिल्या.
तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची विश्वकर्मा योजना ही योजना बाराबलुतेदार आणि ते करीत असलेला व्यवसाय करणारे लोक यांच्यासाठी असून याचा लाभ देखील सर्वांपर्यंत पोहोचवा अशा सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आल्या, यावेळी कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.