राजापूर : काल राजापूर येथे भारतीय जनता पार्टी शहर व जिल्हा परिषद कोदवली विभागाची शक्ती केंद्रप्रमुख व बूथ प्रमुख यांची बैठक घेण्यात आली या बैठकीला जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत मंडळ अध्यक्ष सुरेश गुरव जिल्हा सरचिटणीस रवीजी नागरेकर उपजिल्हाध्यक्ष अभी गुरव गोठणकर गुरुजी आदी उपस्थित होते.
यावेळी राजापूर शहर अध्यक्षपदी संदेश दत्तप्रसाद आंबेकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी जाहीर केली व त्यांना नियुक्ती पत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणजे केंद्र शासनाने सुरू केलेली विश्वकर्मा ही बारा बलुतेदार आणि त्यांचा व्यवसाय करणारे लोक यांच्यासाठी महत्त्वाची ठरत असून या योजनेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत यांनी केले व संघटनात्मक आढावा घेण्यात आला व कार्यकर्त्यांचे प्रश्न समजून घेत त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले गेले. अध्यक्ष राजेशजी सावंत यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार संघटनात्मक वाढीसाठी काम करू असे तालुका प्रमुख यांनी सांगितले. संघटनात्मक बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली.