सलग दोन वर्षे यशाची परंपरा कायम
चिपळूण – (प्रमोद तरळ) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित केलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वक्तृत्व स्पर्धेत महाविद्यालयीन गटातून सिध्दी चाळके हिने प्रथम क्रमांक पटकावला…
चिपळूण तालुका बौध्दजन हित संरक्षक समिती स्थानिक चिपळूण व मुंबई आयोजित चिपळुणातील विश्र्वभुषन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे महपरिनिर्वान दिनी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती ह्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला…या स्पर्धेत कु.सिध्दी चाळके सहभागी झाली होती…तिने गेल्या वर्षी देखील सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला होता…या वर्षी भारतातील सामजिक व राजकीय सौहार्द का बिघडू लागला आहे या विषयावर तिने मनोगत व्यक्त केले…. भारतात लोकशाही च्या नावाखाली चालू असलेली घराणेशाही या वर ती बोलली…लोकशाहीचे प्रमुख चार आधारस्तंभ ढासळत चालले आहेत त्यामुळे सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे..आपण सुजाण नागरिक म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत ह्यावर ती बोलली… राजकीय नेत्यांनी आपल्या सत्ता मत्ता आणि लोभ यापलीकडे जाऊन आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत… असं ती म्हणाली….आपण आपल्या देशाचे सुजाण नागरिक आहोत आणि हीच सृजनशीलता जागरूक ठेऊन आपण मतदान केले पाहिजे असं मत व्यक्त केले… तिचा विषयाप्रती असलेला अभ्यास आणि उत्कृष्ट वक्तृत्व शैली यामुळे तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. संकल्प सामाजिक संस्था मुंबई यांनी कु. सिध्दी हिचे जाहीर अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत