विधानसभेत आरोग्यमंत्र्यांची घोषणा
आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या प्रयत्नांना यश
विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विषय चर्चेला; मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे मानले आभार
विजय शेडमाके.
दिनांक १३डिसेंबर २०२३ गडचिरोली
गडचिरोली स्त्री रुग्णालयामध्ये १०० बेडचे वाढीव रुग्णालय मंजूर व्हावे याकरता आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी सातत्याने प्रयत्न केले. विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्हा स्त्री व बाल रुग्णालयात सिजेरियन प्रसूतीनंतर मृत्यू पावलेल्या महिलांचा विषय चर्चेला आला असता या ठिकाणच्या आरोग्य विषयक समस्या लक्षात घेता राज्याचे आरोग्य मंत्री ना .तानाजी सावंत यांनी गडचिरोली येथील स्त्री व बाल रुग्णालयास वाढीव १०० बेडचे रुग्णालय मंजुर करीत असल्याची घोषणा केली. अखेर आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या या प्रयत्नांना या माध्यमातून यश मिळाले असून या निर्णयाचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी स्वागत केले केले आहे. १०० बेडचे रुग्णालय मंजूर झाल्याने आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना .अजितदादा पवार व राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांचे आभार मानले आहे.
गडचिरोली जिल्हा केंद्र मोठा असून या ठिकाणी छत्तीसगड ,मध्य प्रदेश तसेच गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवरून मोठ्या प्रमाणामध्ये रुग्ण येत असतात त्यामुळे मुख्य महिला रुग्णालयात मोठी गर्दी होऊन उपचाराअभावी अनेक महिलांना नाहक जीव गमवावा लागतो. त्यामुळे या ठिकाणी रुग्णालयाची बेड संख्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे ची सातत्यानं मागणी होती. शंभर बेडचे अतिरिक्त वाढीव रुग्णालय मंजूर झाल्यास या ठिकाणी परिसरातील रुग्णांना होणारा त्रास कमी होईल त्याकरिता सातत्याने मागणी केली होती. या घोषणेमुळे त्यांच्या या मागणीला यश मिळाले असुन त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.