‘ देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना ७ दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचा शुभारंभ सायले (ता.- संगमेश्वर) येथे संपन्न झाला. या शिबिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी आठल्ये-सप्रे- पिञे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, सायले गावच्या सरपंच सीमा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष विजय पांचाळ, तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख प्रा. सुनील सोनावणे, प्रा. अनिकेत ढावरे आणि प्रा. पिया मोरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंटामुक्ती अध्यक्ष विजय पांचाळ यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तणुकीतून तसेच श्रमसंस्कारातून आपल्या महाविद्यालयाचे नाव रोशन करावे व प्रत्येक विद्यार्थ्यांनी आदर्श विद्यार्थी कसा असतो हे दाखवून द्यावे, असे आवाहान याप्रसंगी केले. सायले गावच्या सरपंच सीमा कदम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. तेंडोलकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, विद्यार्थी कसा असावा, श्रमसंस्कार शिबिरात त्यांची भूमिका कशी असावी आणि कशाप्रकारे या श्रम संस्कारातून एक आदर्श नागरिक म्हणून समाजापुढे आपण उदाहरण ठेवू शकतो याबाबत सविस्तर विवेचन केले. श्रमसंस्कार शिबिरासाठी संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष पाठक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
फोटो- श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सायलेच्या सरपंच श्रीमती कदम, श्री. पांचाळ, प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपस्थित शिक्षक आणि शिबिरार्थी स्वयंसेवक. दखल न्यूज महाराष्ट्र.