देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील वार्षिक क्रीडा स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाल्या. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी इनडोअर तसेच आउटडोअर खेळांच्या वैयक्तिक व सांघिक प्रकारांचा मनमुराद आनंद लुटला. कमीत कमी दिवसांमध्ये अधिकाधिक खेळांच्या प्रकारातील स्पर्धा शांततेने संपन्न केल्याबद्दल विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विशेष कौतुक केले. अशाच क्रीडा स्पर्धातून विद्यार्थी आपल्या आवडत्या खेळात महाविद्यालयाचे नाव मोठे करतील, अशा सकारात्मक भावना व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. वार्षिक क्रीडा स्पर्धांमधील क्रिकेट, कबड्डी व खो-खो खेळामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. सर्व खेळांना विद्यार्थी प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्ट्या, वाद्यांच्या सूराने व घोषणांच्या जोरदार आवाजाने प्रतिसाद दिला .
सांघिक खेळातील विजेते व उपविजेते वर्ग खालील प्रमाणे:-
१. क्रिकेट मुले-विजेता: १२वी संयुक्त.
उपविजेता: ११वी वाणिज्य.
२. हॉलीबॉल मुले-विजेता: १२वी वाणिज्य-ब.
उपविजेता: १२वी संयुक्त.
३. खोखो मुले-विजेता: १२वी कला.
उपविजेता: १२वी संयुक्त.
४. कबड्डी मुले-विजेता: १२ वी कला.
उपविजेता: ११वी कला.
५. क्रिकेट मुली-विजेता: १२वी वाणिज्य.
उपविजेता: १२वी वाणिज्य-ब.
६. कबड्डी मुली-विजेता: १२वी वाणिज्य.
उपविजेता: ११वी कला.

वैयक्तिक क्रीडा प्रकार:-
१. कॅरम मुले-
विजेता- प्रणय जाधव(११वी कला).
उपविजेता- वृषभ चरकरी(१२वी वाणिज्य).
२. कॅरम मुली-
विजेती- मनाली चव्हाण(११वी वाणिज्य).
उपविजेती- स्नेहल साळवी(१२वी वाणिज्य).
३. १०० मी. धावणे- मुले
प्रथम- प्रवीण शेळके(१२वी कला).
द्वितीय- नीरज बावधने(१२वी संयुक्त).
तृतीय- साहिल पगार(१२वी कला).
४. २०० मी. धावणे- मुले
प्रथम- नीरज बावधने(१२वी संयुक्त).
द्वितीय- सुरज कुळ्ये(१२वी संयुक्त).
५. ४००मी. धावणे- मुले
प्रथम- चेतन खामकर (११वी कला).
द्वितीय- साहिल कुळ्ये(१२वी संयुक्त).
तृतीय- राज धुळप(११वी कला).
६. १०० मी. धावणे- मुली
प्रथम- रीया वेल्ये(११वी वाणिज्य-ब).
द्वितीय- बुशरा वारोसे(१२वी वाणिज्य).
७. ४०० मी. धावणे- मुली
प्रथम- अक्षता रेवाळे (११वी कला).
द्वितीय- कोमल रेवाळे (११वी कला).
तृतीय- आकांक्षा सावंत(११वी कला).
वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सानिका भालेकर क्रीडाशिक्षक प्रा. सागर पवार, विद्यार्थी स्वराज्य मंडळाचे सदस्य आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. सर्व सहभागी व यशस्वी खेळाडूंचे आणि कर्मचाऱ्यांचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी अभिनंदन केले.
फोटो- क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या १२वी संयुक्त वर्गाच्या संघातील खेळाडू आणि सहकारी.
छाया- प्रा. सुभाष मायंगडे.