बातम्या

भिमा कोरेगांव शौर्यदिनी सलामी दिल्याने वर्षभर नविन ऊर्जा मिळतो. अँड. विनय बांबोळे.

प्रतिनिधि : विजय शेडमाके. २/१/२०२४
गडचिरोली – भिमा कोरेगांव शौर्यदिन महोत्सव कार्यक्रम व विजया स्तभाला सलामी दिल्याने वर्षभर नविन उर्जा मिळतो. दलितांवर होणार्‍या अन्याय – अत्याच्यारावर लढा देण्याकरीता एकजुट निर्माण होते म्हणुनच वैनगंगा नदि किणार्‍यावर चंद्रपूर – गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यचे बौद्ध बांधव मोठ्या संख्येने विजया स्तंभाला सलामी देण्याकरीता एकत्र येऊन त्या शुरविराचे स्मरण करतात असे मोलाचे मार्गदर्शन शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. विनय बांबोळे यांनी भिमा कोरेगांव शौर्यदिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले. भिमा कोरेगांव शौर्यदिन महोत्सव व विजया स्तंभाला सलामी कार्यक्रम वैनगंगा नदिकिणारी व्याहाड रोडवर शेड्युल कॉस्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. विनय बांबोळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटक संजय दौलत मेश्राम डायरेक्टर रियलस्टॉर मार्केटिंग गडचिरोली हे होते तर दिप प्रज्वलन रिपब्लिकन पार्टी चंद्रपूर जिल्हयाचे अध्यक्ष गोपाल रायपुरे तर स्वागताध्यक्ष रिपब्लिकन पार्टी गडचिरोली जिल्हयाचे अध्यक्ष माजी प्राचार्य मुनिश्वर बोरकर हे लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणुन वंचितचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष बाळू ढेभुर्णे, रिपाईचे जेष्ठ नेते एड शाताराम उंदिरवाडे , सामाजिक कार्यकर्ते नरेश महाडोरे , वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष जि. के. बारसिंगे , शेकाफेचे जिल्हाध्यक्ष पंडित मेश्राम, मिलिंद भानारकर , प्रितम साखरे , पो. पा. अनिल खेवले , अँड. चिळंगे , विलास उंदिरवाडे , मुख्याध्यापक जनबंधु आदि लाभले होते. या प्रसंगी गोपाल रायपुरे म्हणाले की , केवळ शौर्यदिन कार्यक्रमावर आपणाला थांबायचे नाही तर होणाऱ्याअन्याय अत्याचारा वर लढा देण्यासाठी आपण सज्ज झाले पाहीजे आपल्या एकजुटीची ताकद दाखविण्याची आज गरज आहे. प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी पाचसे महार बॅटालियन ने शौर्य दाखवुन पेशव्याचा नायनाट केला. त्या शुरविराचे स्मरण म्हणुन आजचा कार्यक्रम होय. याप्रसंगी वंचितचे बाळू ढेभुर्णे म्हणाले की भिमा कोरेगांवचा शुरविरांनी तलवारीच्या जोरावर लढा देऊन पेशव्यांचा पराभव केला. आता २०२४ मधे आपण एकजुटीने मतदानाच्या जोरावरआपली ताकद दाखवायची आहे. हे काम वंचितांनी करावयाचे आहे असे सांगीतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंडित मेश्राम संचलन दिलीप गोवर्धन तर आभार अरुण शेन्डे यांनी मानले. शेड्युल कॉस्ट फेडरेशनच्या रुपेश सोनटक्के , हेमंत पा. मेश्राम , एन.पी. लाळे , विनोद जांभुळकर. शरद लोणारे , निलकंठ सिडाम , अमोल मेश्राम , चेतन सहारे संघरत्न निमगडे , सुमित्रा राऊत ‘ आदि कार्यकार्यकर्त्याचे मोलाचे सहकार्य केले. रात्रौ भोजनदान नंतर भिम गिताचा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमास चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्यातील बौद्ध बांधव हजारोंचा संख्येनी उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!