मुंबई – कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने आज मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ रोजी स. १० वा पासून भायखळा जिजामाता उद्यान ते विधान भवन ‘दे धक्का मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई या मातॄसंस्थेच्या माध्यमातून आणि कुणबी एकीकरण समिती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील सर्व कुणबी संघटना उद्या एकवटणार आहेत तरी सर्व कुणबी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे “घर जळत असताना, घरात झोपून राहू नका…! हक्क अधिकारासाठी रस्त्यावर उतरा’ निकलो बाहर मकानों से…! जंग लढो बेईमानों से…! असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि कुणबी युवा मुंबई यांनी केले आहे