आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने आदिवासी मुला मुलींची इंग्रजी माध्यमाची आश्रमशाळा गडचिरोली येथे लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
विजय शेडमाके.
दिनांक २२ फेब्रुवारी गडचिरोली”
मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार व राज्यातील महायुतीची सरकार सदैवच आदिवासी विद्यार्थी व आदिवासी समाजाच्या पाठीशी राहीले असून आदिवासी जनकल्याणाच्या असंख्य योजना या सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असून त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लाभार्थी मेळाव्याच्या प्रसंगी केले. यावेळी मंचावर राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, भारतीय जनता पार्टीचे आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष , भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रशांतजी वाघरे ,प्रकल्प अधिकारी मीना साहेब यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉक्टर देवरावजी होळी म्हणाले की, महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विभागाच्या मार्फत एवढया योजना आहेत त्या योजना आदिवासी विभागाच्या मार्फतीने प्रत्येक आदिवासी समाजाला मिळाल्या तर आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो.
आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आदिम जमाती माळ्या समाज आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोलाम समाज आहे अशा विविध आदिवासी आदिम जमातीचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या देशाचे पंतप्रधान नरेंद्जी मोदी साहेबांनी पीएम जनमन योजना संपूर्ण देशभरामध्ये सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महिला सशक्तिकरण अभियान सुरू केले आहे . माझ्या गडचिरोली जिल्ह्यातील सर्व समाजाच्या महिला असतील, आदिवासी समाजाच्या महिला असतील , तसेच इतर संपूर्ण महिलांचा सुद्धा विकास झाला पाहिजे या दृष्टीने मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर देशभरामध्ये उपक्रम सुरू करण्यात आले असल्याचे ते यावेळी म्हणाले..