टिटवाळा – (प्रमोद तरळ) टिटवाळा कोकण रहिवाशी मंडळ (रजि.) यांच्या वतीने रविवारी दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी सायं. प्रथमे हाॕल,टिटवाळा येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला यंदा मंडळाचे हे ९ वे वर्ष असून विभागातील बहुसंख्य महिला वर्ग या हळदीकुंकू समारंभासाठी उपस्थित होता.
मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.यशवंतजी परब यांच्या हस्ते दीप प्रज्वलन,श्री.गणेशाची पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
सुत्रसंचालन सौ.निधी राणे, श्री.सचिन परब, श्री.प्रविन टोले यांनी केले.
गणपती बाप्पाचे गाणे,पोवाडा,लहान मुला मुलींचे डांन्स सांस्कृतिक कार्यक्रम,हळदीकुंकू समारंभाला सुरवात करण्यात आली.
सौ वैदेही प्रमोद नांदगावकर मॕडम यांची उपस्थिती लाभली.
उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छा देऊन सत्कार करण्यात आला.
श्री.प्रमोदजी नांदगावकर,मोहन कणेरी,शंकर पेंडूरकर,निलेश राणे,प्रवीण आंब्रे,गुणाजी गावडे,प्रवीण टोले,सचिन परब,योगेश टोले,प्रकाश चौगुले,नामदेव पिचुर्ले, दत्ताराम म्हालिम,मयुरेश तावडे,राजेंद्र पिंपुटकर, गोपिचंद घाटये, राजेंद्र गावडे,रवी दसुरी,नामदेव राजापकर,मनोहर टेंबकर,किशोर नाईक, होणाजी परब , संतोष मोरे,दिलीप चिपकर, महादेव तारी, प्रकाश भोगले ,मिलिंद ठाकुर,स्वप्निल मेस्री कार्यकारिणी सद्दस्य,अनेक सभासद सहकार्य करायला उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ.शितल पेंडूरकर, प्रेमलता तावडे, करूणा परब,निधी राणे,सिमा पिंपुटकर, अर्चणा ठाकुर,ऋतिशा हिर्लेकर,सरस्वती म्हालीम, स्नेहल पालकर, माधवी गावडे,पुर्वा टोले,रसिका मेस्री,प्रियंका चौगुले,लीना मेस्री,सानिका गोरीवले, प्रज्वल चौगुले यांनी परिश्रम घेतले.सर्वानी आपल्या कार्यक्रमास प्रत्यक्ष सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल कोकण रहिवाशी मंडळाच्या वतीने उपस्थितांचे आभार मानले आहेत