मुंबई – (प्रमोद तरळ) ‘मशाल घरोघरी’ या कार्यक्रमांतर्गत तुळजापूर ते मातोश्री अशी १४०० किमी अंतर असलेल्या पदयात्रेचे जोगेश्वरी पूर्व येथे आगमन झाले
यावेळी शिवसेना शाखांना भेटी देत पदयात्रा जोगेश्वरी मुंबई येथे पोहोचली या मशाल पदयात्रेत जोगेश्वरी शाखेचे ज्येष्ठ शिवसैनिक व राजापूर तालुक्यातील सागवे संपर्कप्रमुख विद्याधर पेडणेकर, शाखाप्रमुख अमर मालवणकर, सोलापूर विधानसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुख कालिदास कांदळगावकर, उपशाखाप्रमुख मोरंये, सावंत आदी मान्यवर पदयात्रेत सहभागी झाले होते.
तुळजापूर ते मातोश्री मुंबई असा हा पदयात्रेचा मार्ग असून १४०० किमी मशालीसह प्रवास करणाऱ्या या पदयात्रेचे ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रकाश भोसले, जयवंत सावंत, स्नेहा विचारे, महिला शाखा संघटिका सुचित्रा चव्हाण उपविभाग प्रमुख बाळा साटम, किशोर सावंत आदी अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी पद यात्रेचे स्वागत केले या पदयात्रेची मातोश्री वांद्रे पूर्व येथील पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट देऊन सांगता होणार आहे