रत्नागिरी – (प्रमोद तरळ)
कोकण रेल्वे प्रशासन यांच्या विरोधात कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्यासाठी कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कॄती समिती (रजि.) यांच्या वतीने मंगळवार दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य रेल्वे स्थानक रत्नागिरी येथे जाहीर उपोषण करण्यात येणार आहे
कोंकण रेल्वे प्रशासनाने कोंकण रेल्वे मार्गावर येणाऱ्या भुमिपुत्राच्या जमिनी संपादित केल्या होत्या त्यातील बहुतांश प्रकल्पग्रस्त अद्याप नोकरीपासून वंचित आहेत या मागणीच्या अंमलबजावणीसाठी कोंकण भुमि प्रकल्पग्रस्त कॄती समितीच्या वतीने जाहीर उपोषण करण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी अध्यक्ष – संतोष चव्हाण – ९१२१५९९९१८, उपाध्यक्ष संदिप आंब्रे – ८७८८६१४९४१, कार्याध्यक्ष विनायक मुकादम – ९९२१४३५३७८, सचिव अमोल सावंत – ९१७५१८३२३५, सहसचिव प्रभाकर हातणकर – ९४२०९१०८३६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन समितीने केले आहे