बातम्या

खेड तालुक्यातील मौजे जैतापूर येथील पायरीचा माळ धनगरवाडी रस्त्याच्या सोयी पासून वंचित.

आजारी रूग्णांना घ्यावा लागतो डोळीचा आधार.

खेड तालुक्यात विकासाचा महापूर वाहत असल्याच्या वल्गना स्थानिक लोकप्रतिनिधी करत असताना, सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेली मौजे जैतापूर गावातील पायरीचामाळ धनगरवाडी मात्र स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही रस्त्याच्या मुलभूत सुविधा होण्यासाठी शासनदरबारी संघर्ष करत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीत एकही धनगरवाडी रस्त्याच्या मुलभूत सुविधांपासून वंचित राहणार नाही असे जाहीर सभांमध्ये वारंवार विधान केले होते. परंतु आमदारकीची टर्म संपत आली तरी स्थानिक आमदार महोदयांना धनगरवाड्यांचा विसर पडलेला आहे. आजही खेड तालुक्यातील अनेक धनगरवाड्या रस्त्याच्या मुलभूत सुविधांसाठी शासनदरबारी संघर्ष करत आहेत.
पायरीचामाळ धनगरवाडी येथे रस्त्याची सोय नसल्याने आजही आजारी रूग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी डोळीचा वापर करावा लागत आहे. कोट्यावधी रुपयांची भुमिपूजनांचे कार्यक्रम स्थानिक आमदारांकडून सातत्याने सुरु आहेत. परंतु धनगरवाड्यांसाठी किमान कच्चे रस्ते करण्यासाठी निधी नाही. ही खेदाची बाब आहे.
धनगगरवाड्यांच्या मुलभूत विकासाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने धनगर समाजाला कोणी वाली नसल्याचे चित्र खेड तालुक्यात पाहाण्यास मिळत आहे. रामचंद्र बाबू आखाडे जिल्हाध्यक्ष

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!