बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त सत्यशोधक शिव प्रवर्तक समितीतर्फे मुंबईत नारी सन्मान सोहळा संपन्न.

मुंबई :- (प्रमोद तरळ)
सत्यशोधक शिव प्रवर्तक समितीचे मार्गदर्शक प्रबोधनकार मा. काका जोयशी तथा कोकणातील गाडगेबाबा यांच्या संकल्पनेतून आलेला नारी सन्मान सोहळा – स्वतः मुलीवर जो दु:खाचा प्रसंग अचानक ओढवल्याने प्रथमतः संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड येथील गावकर परिषदेमधील विचारांती मा. मारुती काका जोयशी व यांच्या सहकारी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून अनिष्ट प्रथेवरती खऱ्या अर्थाने प्रोत्साहन देणाऱ्या आमच्या माई यांनी व तमाम समाज बांधवांनी समाजाच्या परंपरेला छेद देत पतीच्या निधनानंतर मुलीचे अलंकार उतरवू नका, तिला समाजात उत्तम जीवन जगण्यासाठी प्रोत्साहन द्या असा महत्वकांक्षी आणि ठाम निर्णय दि. १७ ऑक्टोबर २०१७ रोजीच जाहीर केला त्यानंतर दि. ४ मे २०२२ रोजी कोल्हापूर येथील हेरवाड या ग्रामपंचायतीने जाहीर रित्या ठराव करण्यात आला.
त्याप्रमाणे निसर्गवासी माईंच्या प्रथम, व्दितीय आणि तृतीय स्मृती दिनानिमित्त हा नारी सन्मान सोहळा बोरीवली
येथे सर्व सामान्य व समाज प्रवर्तक यांच्या उपस्थितीत साजरा होत आहे.
सदर सोहळ्यास मा. गजानन सुवरे (मा. नायब तहसीलदार, मुंबई), मा. रविंद्र येळींजे (अध्यक्ष – राष्ट्रीय अत्याचार प्रतिबंधक मोर्चा), मा. समिधा ज्ञानेश्वर जाधव (सामाजिक कार्यकर्त्या), मा. भिमराव गमरे ( संविधान बचाव अभियान कार्यकर्ते), मा. प्रभाकर धनावडे (उद्योजक मुंबई), मा. भाई जोशी (राजापूर), मा ज्ञानेश्वर संकपाळ (नाबार्ड अधिकारी मुंबई), मा. पांडुरंग सकपाळ (संचालक अपना बाजार मुंबई), मा. प्रतिभा साळुंखे ( RPF,CBD बेलापूर कोकण रेल्वे), मा. ज.वि.पवार (संस्थापक दलित पँथर), मा. दिपिकाताई आंग्रे (सचिव कुणबी महिला मंडळ मुंबई) आदी मान्यवर मंडळीनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी उपस्थित विधवा महिलांचा सन्मान करण्यात आला

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!