बातम्या

कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ ठाणे संघटनेतर्फे कोकणातील गणेशोत्सव २०२४ साठी नियोजनासंदर्भात रावसाहेब दानवे यांना निवेदन पत्र.

ठाणे – (प्रमोद तरळ) कोकणात यंदा दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ रोजी येणाऱ्या गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना आपल्या गावी मुळ घरी गणेश पूजनासाठी जाणे असते. गणेशोत्सव हा कोकणातला मोठा उत्सव. सदर उत्सव साजरा करण्याचे नियोजन करून चाकरमनी मोठ्या प्रमाणात साधारण ३ दिवस आगाऊ कोकण रेल्वे मार्गाचा सर्रास प्रवास प्रचंड प्रमाणात करतात.
गणेशोत्सव २०२४ करिता चाकरमनी प्रचंड प्रमाणात आपल्या सहकुटुंब सहपरिवारासह
उपलब्ध प्रवासी वाहनातून आपल्या गावी जाणारे असतात. त्यातच मोठ्या प्रमाणात चाकरमनी कोकण रेल्वेचा सुरक्षित आणि सुखकर प्रवासास प्राधान्य देतात. याकरिता बऱ्याच प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे गाड्यांची मागणी असते. ती दरवर्षी भारतीय रेल्वे कडून कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचे नियोजन केले जाते. या निवेदन पत्रकाद्वारे आपणांस खालील काही मुद्दयांवर सूचित संदर्भ आणि मार्गदर्शन अपेक्षित करीत मागणी मुद्दे मांडत आहोत. 
·        कोकण रेल्वे मार्गावरून गणेशोत्सव दरम्यान परराज्यात जाणाऱ्या गाड्यांना मुभा मर्यादित करावी. त्याचप्रमाणे माल- वाहतूक सेवा आणि रो रो सेवा ही गणेशोत्सव काळात मर्यादित करावी.
·        मुंबई ते थिविम स्थानकांदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर सकाळ, दुपार, संध्याकाळ शक्यतो जास्तीत जास्त आरक्षित आणि अनारक्षित गाड्यांना प्राधान्य देण्यात यावे.
·        कोकण रेल्वे मार्गावर थिवीम, सावंतवाडी करिता; मुंबई छ. शिवाजी महाराज टर्मि., दादर टर्मि., वांद्रे टर्मि., लो. टिळक टर्मि. दिवा, कल्याण जं., पनवेल, पुणे जंक्शन, वसई येथून अनुक्रमे निदान एक गाडी सोडण्यात यावी.
·        रात्रौ ११:०५ मि. मु. छ.शिवाजी म. टर्मि. येथून सुटणारी कोकणकन्या एक्स. गाडीच्या काही वेळ अगोदर मुंबई – रत्नागिरी स्थानकादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर (आरक्षित/अनारक्षित) गाडी उपलब्ध करून देण्याची रितसर सोय करण्यात यावी.
·        सद्य परिस्थितीत अनारक्षित गाड्या चालविणे शक्य नसल्यास आरक्षित गाड्यांचे आरक्षण तिकीट विक्रीत दलालांना अंकुश ठेवून सरसकट ऑनलाईन आरक्षणांना प्राधान्य द्यावे. तसेच गतवर्षी प्रमाणे तिकीट आरक्षणाचा गोंधळ टाळला जईल याकडे कठोर पावले उचलावीत
·       विशेष गाड्यांची सेवा देताना आरक्षित प्रवासी तिकीट दर सेवेत किमान ३०% सवलत करण्यात यावी.
·        कोकण रेल्वेचे वेळापत्रक हे योग्य प्रमाणात उपलब्ध असावे आणि गाड्याची वाहतूक वेळापत्रका नुसारच असावीत. तसेच गाड्यांची वेळापत्रक जुळताना संबंधीत प्रवासी संघटनांनाही विचारात घ्यावे.
या निवेदनाची गंभीर दखल घेवून कोकणवासियांच्या सुरक्षिततेची तसेच कोकणवासियांच्या
गणेशोत्सवात रेल्वे, राज्य परिवहन, गणेश आगमन- निर्गमन काळात नियमावलीं नुसार आपल्या मार्गदर्शना खाली जाहीर करण्याची विनंती करीत कोकण रेल्वे मार्गावर अधिक गाड्यांची उपलब्धता करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे संघटना प्रमुख राजू सुदाम कांबळे, अध्यक्ष श्री सुजित सुरेश लोंढे,सचिव दर्शन पांडुरंग कासले यांच्या सह्या आहेत

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!