बातम्या

आरमोरी येथे भव्य बाईक रॅलीला खासदार नेते यांनी स्वतः बाईक स्वार होऊन दाखवली हिरवी झेंडी.

विजय शेडमाके.
दिं. १७ एप्रिल २०२४
(आरमोरी)
आरमोरी येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने आज दिनांक १७ एप्रिल रोज बुधवारी रामनवमीच्या शुभ प्रसंगी आरमोरी शहरात व आरमोरी भागातील ग्रामीण भागात भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या बाईक रॅलीला आरमोरी येथून महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा विद्यमान खासदार श्री. अशोक जी नेते यांनी या बाईक रॅली सहभाग घेऊन बाईक स्वार होत हिरवी झंडी दाखवून बाईक रॅलीचा शुभारंभ केला प्रचार कार्यालय आरमोरी येथे पदाधिकाऱ्यांची संवाद साधत विजयाच्या कामाला लागा असा शुभ संदेश देत माता दुर्गा मंदिर जवळील राम मंदिराला भेट देऊन नतमस्तक होत समस्त आरमोरी वासिय जनतेला राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या..

यावेळी सहकार महर्षी प्रकाश सावकार पोरेड्डीवार, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे,भाजपा तालुकाध्यक्ष पंकज खरवडे, आरमोरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पवन भाऊ नारनवरे, नगरपरिषदेचे माजी आरोग्य सभापती भारत भाऊ बावनथडे,जिल्हा सचिव नंदुजी पेठ्ठेवार,उपाध्यक्ष अरुण भाऊ हरडे, नंदू नाकतोडे, विलास पारधी, सुशील सावकार पोरेड्डीवार ,आदिवासी तालुका अध्यक्ष खेमराज जांभुळे, मिनाक्षीताई गेडाम, ओबीसी आघाडीचे नेते अभिमन्यूजी राऊत अरसोडा , अक्षय हेमके युगल समृतवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!